कोठे काय पाहाल?
गणेशोत्सवातील उत्साह टिपेला पोचला असून, कलात्मक मूर्तींसह सार्वजनिक तरुण मंडळाचे देखावे खुले होऊ लागले आहेत. रविवार (ता. २०) पासून सर्वच देखावे खुले होणार आहेत. शहरात कोठे काय पाहाल, याचा हा धांडोळा.
---------------
शिवाजी पेठ
- कै. उमेश कांदेकर युवामंचचा ‘वाघनखं’ हा ऐतिहासिक सजीव देखावा
- मित्रप्रेम तरुण मंडळाचा ऐतिहासिक सजीव देखावा
- बुवा चौकातील जय शिवराय मित्र मंडळाचा विनोदी सजीव देखावा
- खंडोबा तालीम रोडवरील शिवशक्ती स्पोर्टस्चा विनोदी देखावा
- रंकाळा रोडवरील महादेव तरुण मंडळाची पौराणिक गुफा प्रतिकृती
- विद्यार्थी कामगार मित्र मंडळाचा विधायक लाॅटरी उपक्रम
- गोल्डस्टार मित्र मंडळाचा ऐतिहासिक सजीव देखावा
- नाथागोळे तालीम मंडळाची सातारा येथील कल्याणगड दत्त गुफा प्रतिकृती
- लाड चौकातील जयशिवराय मित्र मंडळाचा ऐतिहासिक देखावा
- जुना वाशी नाका मित्र मंडळ- गणेश दरबार
-------------------
मंगळवार पेठ
- कलकल ग्रुपची योगेश्वर शक्तीश्वर शीर्षासनातील शिवस्वरूप मूर्ती
- राधाकृष्ण भक्त मंडळाची जगन्नाथाची मूर्ती
- पद्मावती मंडळाची ११ फुटी प्राचीन आकर्षक मूर्ती
- गुडलक तरुण मंडळ, खासबागची रंगपंचमी खेळणारी मूर्ती
- जयविजय मंडळाची मल्लखांब खेळणारी गणेशमूर्ती
- शिवालय मित्र मंडळाची शेषनागावर आरूढ दत्तात्रय रूपातील मूर्ती
- प्रिन्स क्लबचा ‘बाप्पांचा वाढदिवस’ देखावा
- लेटेस्ट तरुण मंडळाचा ऐतिहासिक सजीव देखावा
- तस्ते गल्ली तरुण मंडळाची झाडातील मूर्ती
- श्री तरुण मंडळ (कोष्टी गल्ली) ४५ फुटी विठ्ठलाची प्रतिकृती
- गडगडाट ग्रुपची नरमुखी आदिविनायक दर्शन
- दत्त महाराज काशीद चौकाचा सजीव देखावा
- जासूद गल्ली महादेव मंडळाचा सजीव देखावा
- हनुमान विकास मंडळाचा १२ जोतिर्लिंग देखावा
- जय शिवराय फुटबॉल प्लेअर्स मंडळाचा शिवअवतारी संत बाळूमामा सजीव देखावा
-----------------
छत्रपती शिवाजी उद्यमनगर
- नरसिंह तरुण मंडळातर्फे १५ फुटांची चेटकिणीचा तांत्रिक देखावा सोमवारपासून सुरू
- आकर्षक कोल्हापूरचा सिंदुरवर्ण रूपातील १२ फुटी गणेश मूर्ती
- न्यू छत्रपती शिवाजी उद्यमनगर फ्रेंडस् सर्कलचा पक्षीरूपे विघ्नहर्ता रूपातील गजानन ही चित्ताकर्षक मूर्ती
- देशभक्त मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाचा ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’च्या संकल्पनेनुसार हालता १५ फुटी ‘शृंगासुरा’चा तांत्रिक देखावा
- श्री बालावधूत मित्र मंडळाचा हॉन्टेड (हॉरर) हॉस्पिटलचा देखावा
-----------------
राजारामपुरी
- इंद्रप्रस्थ तरुण मंडळ, दहावी गल्ली : काल्पनिक मंदिर
- पद्मराज स्पोर्टस्, नववी गल्ली : काल्पनिक प्राचीन मंदिर प्रतिकृती
- फ्रेंड्स तरुण मंडळ : गुहा
- राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ, सहावी गल्ली : काळभैरव प्रतिकृती
- भगतसिंग तरुण मंडळ : कोल्हापूरचा चिंतामणी मंदिर प्रतिकृती
- जय मराठा तरुण मंडळ ट्रस्ट, चौथी गल्ली : सुवर्ण दगडूशेठ गणपती
- राजारामपुरी स्पोर्टस्, तिसरी गल्ली : दगडूशेठ गणपती व मंदिर प्रतिकृती
- एकता मित्र मंडळ : विद्युत रोषणाईचे आकर्षक मंदिर
- राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ, दुसरी गल्ली : आकर्षक मंदिर प्रतिकृती
------------------
शाहूपुरी
- व्हिनस कॉर्नर : व्हिनस कॉर्नर मित्र मंडळाचा श्री तिरुपती बालाजी सुप्रभात आरती तांत्रिक देखावा
- उषा टॉकीज पिछाडीस : त्रिमूर्ती गणेश मंडळाचा स्त्री-भ्रूणहत्येचा राक्षस प्रबोधनपर सजीव देखावा
- व्यापारी पेठ : श्री गणेश मित्र मंडळाचा ‘महाराष्ट्र पोलिस २४ तास सेवेत’ हा सजीव देखावा
- शाहूपुरी गणेश मंडळाचा श्री वैष्णोवी देवी दर्शन देखावा
- शाहूपुरी युवक मंडळाचा मैदानी खेळाचा तांत्रिक देखावा शनिवारी सुरू होणार
- पहिली गल्ली : ओम गणेश तरुण मंडळाचा दगडू शेठ रूपातील श्रीगणेश
- दुसरी गल्ली : राधाकृष्ण तरुण मंडळातर्फे सातारा येथील श्री शाहू महाराज यांचा दरबार
- तिसरी गल्ली : शिवतेज मित्र मंडळाचा लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या आवाजातील देखावा
- सहावी गल्ली : राधे मित्र मंडळातर्फे चांदीची आभूषण परिधानयुक्त आकर्षक ११ फुटी दगडू शेठ रूपात मूर्ती
- पाच बंगला मित्र मंडळातर्फे ड्रोन हॉस्पिटलचा तांत्रिक देखावा
------------------
जुना बुधवार पेठ
- सोल्जर ग्रुपचा महाकाल देखावा
- व्दिमुखी मारुती मंडळाची झाडाच्या रूपातील कलात्मक मूर्ती
- क्रांतिवीर राजगुरू तरुण मंडळाचा कलात्मक तांत्रिक देखावा
- शिपुगडे तालीम मंडळाचा संस्कृती जपण्याचा संदेश देणारा देखावा
- डांगे गल्ली तरुण मंडळाचा अवयव दान, नेत्रदानावर आधारित देखावा
- हायकमांडो फ्रेंडस् सर्कलचा ‘बाप्पांना सोने-चांदी नको, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी द्या’ देखावा
- अष्टविनायक मित्र मंडळाचा पर्यावरण संवर्धन संदेश देणारा देखावा
---------------
शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ
- साई फ्रेंडस् सर्कलची ऐंशी फूट भव्य गुहा
- हनुमान तरुण मंडळाची वनराज गणेश
- मस्कुती तलाव तरुण मंडळाची अमरनाथ गुहा
- पंचगंगा तालीम मंडळाचा महाराष्ट्र फिल्म कंपनीचा प्रवास उलगडणारा देखावा
-------------
कसबा बावडा
- भारतवीर मित्र मंडळ, चौगले गल्ली : अविवाहित तरुण, तरुणींच्या वाढलेल्या अपेक्षा, बदलती लग्न पद्धती आणि तरुणाई यावर आधारित ‘स्वयंवर’ सजीव देखावा
- गणेशपूजा मित्र मंडळ, कवडे गल्ली : शिवकालीन शेतकरी व सध्याच्या शेतकऱ्यांची स्थिती यावर ‘जगाचा पोशिंदा’ हा सजीव देखावा
- स्वस्तिक मित्र मंडळ, तालीम चौक : जिल्हा परिषदेच्या बदलत्या शाळांवर आधारित सजीव देखावा
- जयभवानी तालीम मंडळ, माळ गल्ली : तिरुपती येथील स्वर्णगिरी मंदिराची प्रतिकृती
- प्रिन्स शिवाजी कॉलनी मंडळ, संकपाळनगर : भुताची गुहा देखावा
- सम्राट मित्र मंडळ, चव्हाण गल्ली : भोपाळ येथील लक्ष्मी नारायण मंदिराची प्रतिकृती
- संदीप स्पोर्टस्, आंबेडकरनगर : मार्लेश्वर येथील महादेव मंदिराची प्रतिकृती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.