डीकेएएससीमध्ये
शब्दसाधनाचे अनावरण
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व शब्दसाधना भित्तिपत्रिकेचे अनावरण झाले. कन्या महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. अनिता आंबेकर यांच्या हस्ते कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांवरील भित्तिपत्रिकेचे अनावरण झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. के. खाडे होते. डॉ. आंबोकर यांनी समाजमाध्यमांची स्थिती आणि गती या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी केले. प्रा. रोहित शिंगे, डॉ. रामा रोकडे,डॉ. विठ्ठल नाईक,प्रा. निलेश जाधव आदी उपस्थित होते.
-----
‘कॅमेऱ्याच्या नजरेतून
समाज'' कार्यक्रम
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे कॅमेऱ्याच्या नजरेतून समाज अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना समाजातील विविध घटक, सामाजिक समस्या, सांस्कृतिक परंपरा, ग्रामीण व शहरी जीवन, तसेच सामाजिक बदल यांचे छायाचित्रण करून त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेतले. छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.संगीता पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ. संतोष कोळी, प्रा. किरण कानडे उपस्थित होते.
------
खोतवाडीत लघुपट
संवाद कार्यक्रम
इचलकरंजी : खोतवाडी येथे शिवतेज तरुण मित्र मंडळ येथे लघुपट संवाद कार्यक्रम झाला.वुमन्स अॅंथम, मॅन, लड्डू, छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र हे लघुपट दाखवत सद्भाव मंचचे संजय रेंदाळकर यांनी संवाद साधला. सहभागी प्रेक्षकांना पुस्तके भेट देण्यात आली. ताहीर शेख यांनी प्रास्ताविक केले. दामोदर कोळी, रोहित दळवी, निलेश बनगे, अक्षय कांबळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.