65357
कोल्हापूर ः नेहरू हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या डी. सी. नरके विद्यानिकेतन संघासोबत उपस्थित प्रशिक्षक.
...........
शालेय नेहरू हॉकी स्पर्धेत
नरके विद्यानिकेतन विजयी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तर नेहरू हॉकी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांमध्ये कुडित्रेच्या डी. सी. नरके विद्यानिकेतनने मिणचेच्या आदर्श विद्यानिकेतनचा चार विरुद्ध शून्य असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत नरके विद्यानिकेतनने पहिल्या उपांत्य लढतीत गडहिंग्लजच्या जागृती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा चार विरुद्ध शून्य असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य लढतीत आदर्श विद्यानिकेतनने नूलच्या इंदिरादेवी जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचा टायब्रेकरवर तीन विरुद्ध दोन असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत नरके विद्यानिकेतने आदर्श विद्यानिकेतनचा चार विरुद्ध शून्य असा पराभव केला. या विजयामुळे नरके विद्यानिकेतनचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. विजयी संघात
वरद पाटील, ओम पाटील, स्वराज वाईंगडे, आनंदा कोरी, अथर्व पाटील, वेदांत माने, वेदांत मोरे, मंदार चौगुले, श्रेयस पाटील, उद्धव कुंभार, समरजित बचाटे, शार्दुल जाधव, कुणाल पाटील, उत्कर्ष पाटील, अजिंक्य पाटील, साईराज पाटील यांचा समावेश आहे. विजयी संघाला शिवाजी डुबल, राज्य क्रीडा मार्गदर्शक आरती हळंगळी यांचे प्रोत्साहन, तर हॉकी प्रशिक्षक सागर जाधव, संजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
.........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.