3386
कोलकाता : येथे शनिवारी भारताविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात गोल केल्यानंतर ब्राझीलचा फुटबॉलपटू पेद्रो सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करताना.
५४९४४
कोलकाता : येथे शनिवारी भारताविरुद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात ब्राझीलचा विनिसियस ज्युनियर चेंडूवर नियंत्रण मिळवताना.
ब्राझीलचा भारतावर ४-०ने विजय
कोलकतामध्ये मैत्रीपूर्ण सामना रंगला, प्रेक्षकांचा जल्लोष
कोलकाता, ता. ३ (वृत्तसंस्था) : येथे आज झालेल्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यात ब्राझीलने भारताचा ४-० असा पराभव केला. दोन्ही संघांमधील या पहिल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ब्राझीलच्या स्टार खेळाडूंचा सहभाग आणि त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दी हेच या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर शनिवारी हा सामना झाला. ब्राझीलचा स्टार खेळाडूंनी सजलेला संघ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये दाखल झाले होते. विनिसियस ज्युनियर, मारकिन्योस आणि एस्टेव्हाओ यांचा ब्राझीलच्या संघात समावेश होता. भारताने सुरुवातीच्या २७ मिनिटांत चांगला प्रतिकार केला. मनवीर सिंग आणि रायन विल्यम्स यांनी वेगवान प्रतिआक्रमण करत ब्राझीलच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. मात्र, २८व्या मिनिटाला एस्टेव्हाओने गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. एस्टेव्हाओच्या पासवर पेद्रोने गोल करत पूर्वार्धाच्या अखेरीस ब्राझीलने आघाडी २-०ने वाढविली.
उत्तरार्धात भारताने आक्रमक खेळ केला. रायन विल्यम्सचा फटका गोलरेषेवरच अडविण्यात आला. मात्र, ५८व्या मिनिटाला भारताच्या बचावातील चुकीचा फायदा घेत सॅम्युअल लिनोने गोल केला. अतिरिक्त वेळेत लिनोने आणखी एक गोल करत ब्राझीलचा ४-० असा विजय निश्चित केला. भारताने याआधी पनामाविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली होती..