कोल्हापूर

शांतिनिकेतन स्कूलचे बॅडमिंटनमध्ये वर्चस्व

CD

लोगो ः जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा
......
चौदा, सतरा वर्षांखालील मुलींमध्ये
‘शांतिनिकेतन’चे बॅडमिंटनमध्ये वर्चस्व

१९ वर्षांखालील गटात जागृती हायस्कूल विजयी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषदतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील शांतिनिकेतन स्कूलने चौदा व सतरा वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले, तर एकोणीस वर्षांखालील मुलींमध्ये गडहिंग्लजच्या जागृती हायस्कूलने विजेतेपदाला गवसणी घातली.
टाकाळा येथील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात शांतिनिकेतन स्कूलने न्यू होरायझन स्कूल, गडहिंग्लजचा २-१ असा पराभव केला. नंदिनी शेटे, ट्विंकल आठवले व गार्गी पाटील यांनी संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्यांना प्रशिक्षक प्रणव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात शांतिनिकेतन स्कूलने प. बा. पाटील माध्यमिक विद्यालय, मुदाळचा २-० असा पराभव करत दुसरे विजेतेपद पटकावले. या संघाकडून लुबेना मुजावर, इच्छा पाटील व त्रिशा हिरेमठ यांनी चांगला खेळ केला.
१९ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात जागृती हायस्कूल, गडहिंग्लजने देवचंद कॉलेज, अर्जुननगरचा २-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्‍घाटन राष्ट्रीय बास्केटबॉल प्रशिक्षक अमित दलाल यांच्या हस्ते झाले. यावेळी हॉकी क्रीडा मार्गदर्शक आरती शेवाळे, क्रीडा शिक्षक प्रणव जाधव, अमोल थोरात, रविकिरण मिसाळ उपस्थित होते. पंच म्हणून विभा पाटील यांनी काम पाहिले.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले विद्यापीठाची संलग्नता नाही, नोंदणीकृत पत्त्यावर कॉलेजही नाही; पुण्यातील प्रकार उघड

SCROLL FOR NEXT