कोल्हापूर

नव्या संघटनेत एकवटले प्राचार्य

CD

(विद्यापीठाचा लोगो वापरावा)

नव्या संघटनेत एकवटले प्राचार्य
अखिल भारतीय शैक्षिक महासंघाची असोसिएशन; सिनेट निवडणुकीच्या घडामोडी
संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१३ : आगामी वर्षभरात सिनेटची निवडणूक होणार असून, त्याचे वारे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात वेगाने वाहू लागले आहेत.
काही संघटना आपली ताकद निर्माण करण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. प्राध्यापकांपाठोपाठ आता प्राचार्य ही अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या प्राचार्य असोसिएशन या नव्या संघटनेत एकवटले आहेत.
शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), सेवक संघ, कर्मचारी संघ, सुप्टा, कास्ट्राईब महासंघ, आजी-माजी विद्यार्थी कृती समिती, ऑल इंडिया स्टुंडटस् फेडरेशन, युवासेना, मनविसे, शाहूसेना, विद्यापीठ विकास आघाडी, शैक्षणिक मंच अशा संघटना विद्यापीठाच्या विविध घटकांचे प्रश्न घेऊन अनेक वर्षांपासून कार्यन्वित आहेत. यामध्ये आता वर्षभरापासून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघानेदेखील प्रवेश केला आहे.
आता प्राचार्यांची नवी असोसिएशन सक्रिय केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी झाले आहेत. या नव्या संघटनेची भूमिका पाहता सिनेटच्या आगामी निवडणुकीत चुरस वाढणार आहे.
.....
प्राचार्यपदाच्या समस्या
प्राचार्यांच्या नियुक्ती मान्यता आणि वेतन प्रक्रियेतील विलंब, अशासकीय अनुदानित व विद्यापीठ संचलित महाविद्यालयांतील नियुक्त्यांना सेवा प्रवेश नियम २०१२ लागू होण्याबाबत स्पष्टता नसणे, शिक्षक आणि प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करणे, पात्र प्राचार्यांना प्राध्यापकपदाच्या ॲकडमिक लेव्हल १४ चे वेतन संरक्षण आणि समकक्ष लाभ न मिळणे, अशा प्राचार्यपदाच्या समस्या आहेत.
.....
सर्वसमावेशक भूमिका
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य आणि विद्यार्थी या घटकांचे प्रश्न सोडविण्याची सर्वसमावेश भूमिका घेऊन शैक्षिक महासंघ शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हानिहाय कार्यकारिणीची निवड केली असल्याचे महासंघाच्या उपाध्यक्ष डॉ. श्वेता चौगुले यांनी सांगितले.
......
कोट
नियुक्ती, वेतन प्रक्रिया, सेवानिवृत्ती असे प्राचार्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते ताकदीने शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी नव्या संघटनेची आवश्यकता होती. त्याची पूर्तता या शैक्षिक महासंघाच्या माध्यमातून झाली आहे.
-डॉ. अरुण चव्हाण, अध्यक्ष, शैक्षिक महासंघ प्राचार्य असोसिएशन
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT