कोल्हापूर

मराठी शाळा भवितव्यासाठी ग्रामसभा

CD

69764
हलकर्णी ः शाळेच्या भवितव्यासाठी आयोजित ग्रामसभेस उपस्थित योगीता संगाज, मल्लिकार्जुन यादगुडी, राजेंद्र पाटील, राजू कळवीकट्टे आदी.

मराठी शाळा भवितव्यासाठी ग्रामसभा
हलकर्णीतील उपक्रम; केंद्रशाळा विद्यार्थ्यांनी फुलविण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १४ ः स्वातंत्र्यपूर्व काळात वर्ष १८५७ मध्ये सुरू झालेल्या हलकर्णी जीवन शिक्षण विद्यामंदिराची विद्यार्थी पटसंख्या घटत चालली आहे. शाळेच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर इतिहासात प्रथमच शाळेच्या भवितव्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेतली. शाळा टिकविण्यासह ती पुन्हा विद्यार्थ्यांनी फुलावी, यासाठी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.
चार वर्षांपासून शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळा टिकविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या ही केवळ शाळेची नव्हे, तर संपूर्ण गावासाठी चिंतेची बाब असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. पालकांनी फक्त मुलांना शाळेत पाठवावे. शाळेच्या विकासाची व सुविधांची पुढील जबाबदारी आमची असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. शाळेत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत हलकर्णी केंद्रशाळेला तालुक्यातील आदर्श शाळा बनविण्याच्या दृष्टीने सभेत सकारात्मक चर्चा झाली. शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांची यादी केंद्रप्रमुख मल्लिकार्जुन यादगुडी व मुख्याध्यापिका वैशाली गुरव यांनी सादर केली.
विलास भोगाने यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच योगीता संगाज, राजेंद्र पाटील, राजू कवळीकट्टे, राजगोंडा पाटील, सादिक नगारसे, डॉ. प्रसन्ना चौगुले, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके, विजय मुंगूरवाडी यांची भाषणे झाली. शाळेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देत, गावाच्या जडणघडणीत या शाळेचे असलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले. शिवकुमार संसुद्धी, अमरदीप व्हसकोटी, राजू वड्राळे, शिवाजी कुराडे, किरण संगाज, बापू वाजंत्री, रमेश पाटील आदींसह व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

SCROLL FOR NEXT