7082
सातारा ः येथे झालेल्या विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारा अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचा कबड्डी संघ
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी
डांगे महाविद्यालयाच्या संघाची निवड
कबनूर ः सातारा येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये झालेल्या विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या कबड्डी संघाने इचलकरंजी मनपा, सांगली जिल्हा व रत्नागिरी जिल्हा संघ यांच्यावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर डांगे महाविद्यालयाच्या कबड्डी संघाची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. संघात अथर्व गावडे, श्रेयस सुरवसे, समर्थ चव्हाण, मयूर साठे, प्रथम जुन्द्रे, साई गावडे, आयुब पवार, चिन्मय माने, विघ्नेश पाटील, साकिब मकानदार, पृथ्वीराज रायनवर, भूषण चव्हाण यांचा सहभाग होता. खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रा. संदीप लवटे, प्रा. रमेश पाटील, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रा. संभाजी पाटील, डॉ. रमेश भेंडगिरी, प्रा. अण्णासाहेब गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
.....................
5978
श्रेया चोपडे
विभागीय कराटे स्पर्धेसाठी श्रेया चोपडेची निवड
माजगाव ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पडळ (ता. पन्हाळा) येथील श्रेया चोपडे हिने सुवर्णपदक पटकावले. तिची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वडणगे येथील जय किसान क्रीडा मंडळ येथे १४, १७ व १९ वर्षांखालील गटांच्या शालेय कराटे स्पर्धा पार पडल्या. यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या २६ किलो वजनीगटात श्रेया चोपडेने सुवर्णपदक मिळवले. तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या २५ किलोखालील वजनीगटात प्रज्वल कोलेने ब्राँझपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलींच्या ४८ किलोखालील वजनीगटात निधी व्हरांबळेने ब्राँझपदक मिळवले. सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक अमर तोडकर व महिला प्रशिक्षक वैष्णवी देवेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
...................
14044
कोल्हापूर : नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंसोबत प्रशिक्षक.
राष्ट्रीय लाठी स्पर्धेसाठी ११ खेळाडूंची निवड
कोल्हापूर : भारत लाठी स्पोर्टस् फेडरेशनच्या वतीने आयोजित ‘द्वितीय राष्ट्रीय लाठी स्पोर्टस् अजिंक्यपद स्पर्धा २०२६’ १४ व १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथे होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ११ खेळाडूंची राज्य संघात निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना भारत लाठी स्पोर्टस् फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी संभाजी चव्हाण यांचे प्रोत्साहन, तर धनश्री इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये श्रेया चव्हाण, प्रांशू हरिपूरकर, सोहम सुतार, वैभव भालकर, राजवर्धन पाटील, यशवर्धन शेंडे, ओंकार तोरसकर, आदित्य पोवार, माहीन शिकलगार, चतुर्थी बुरसे आणि आरोही पाटील यांचा समावेश आहे.
......................
73582
गडहिंग्लज ः मैदानी स्पर्धेतील यशाबद्दल सुकन्या शिवणे हिच्या सत्कारप्रसंगी डॉ. अनिलराव कुराडे, डॉ. राहुल मगदूम, संदीप कुराडे आदी.
मैदानी स्पर्धेतील यशाबद्दल सुकन्या शिवणेचा सत्कार
गडहिंग्लज ः चेन्नई येथे झालेल्या ४१ व्या ज्युनिअर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू सुकन्या सुधीर शिवणे हिने १५०० मीटर धावणेत ब्राँझपदक, तर ४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशाबद्दल शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्याहस्ते सुकन्याचा सत्कार करण्यात आला. शिवराजचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा. बिनादेवी कुराडे, संचालक प्रा. विश्वजित कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, उपप्राचार्य प्रा. तानाजी चौगुले यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा विभागप्रमुख डॉ. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
........................
73583
अक्षरा पोटे
राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी अक्षरा पोटेची निवड
गडहिंग्लज ः विभागीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेत महागाव (ता. गडहिंग्लज) येथील श्री शिवाजी विद्यालय संलग्न कै. भालचंद्र कुलकर्णी ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी अक्षरा अमर पोटे हिने मैदानी क्रीडा प्रकारात यश मिळविले. जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. एसव्हीजेसीटी स्पोर्टस् अकॅडमी डेरवण (रत्नागिरी) येथे झालेल्या विभागीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेत अक्षराने स्प्रिंट प्रकारात चांगली कामगिरी केली. तिने १०० व २०० मीटर धावण्यात प्रथम, ४०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तिला क्रीडा शिक्षक विकास पाटील, अजित पाटील आणि आई-वडिलांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. संस्थाध्यक्ष विजय पताडे, सचिव शिवाजी पोवार, संस्था प्रतिनिधी इंद्रजित पताडे, प्राचार्य संजय केसरकर, पर्यवेक्षक नागेश रेडेकर यांनी तिचा सत्कार केला.
......................
3767
आरोही पवार
आरोही पवारची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड
खोची ः मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पेठवडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयाची विद्यार्थिनी आरोही गणेश पवार हिची निवड झाली. स्पर्धा मंगळवारी (ता. ३) मुंबई येथे होणार आहे. तिला क्रीडा शिक्षक संजय जाधव, पर्यवेक्षक मनोज शिंगे, संताजी भोसले, यशवंत शेवाळे, अलका पाटील व प्रशिक्षक दीपराज जामदार यांचे मार्गदर्शन लाभले.
......................
10055
श्री डौर
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत श्री डौर प्रथम
गारगोटी : टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील श्री भरत डौर याने कोल्हापुरात झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले. या यशामुळे त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री हा बिद्री येथील दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्याला आई जयश्री, वडील भरत, क्रीडा शिक्षक अभिजित पाटील आणि प्रा. एच. आर. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
..................
2295
श्रेया पाटील
राज्यस्तरीय तलवारबाजीत श्रेया पाटीलला ब्राँझपदक
जोतिबा डोंगर ः पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील श्री नवनाथ हायस्कूलची विद्यार्थिनी श्रेया रवींद्र पाटील हिने जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत ईपी प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून ब्राँझपदक मिळविले. तिची राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. तिला श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस. जी. पाटील, क्रीडा शिक्षक दीपक क्षीरसागर व मुख्याध्यापक परशराम आंबी यांचे मार्गदर्शन लाभले.
.....................
10560
अमृता पाटील
विभागीय भालाफेक स्पर्धेत अमृता पाटील प्रथम
कागल : येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी अमृता सुभाष पाटील हिने भालाफेक विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत अमृताने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिला मुख्याध्यापक एस. एस. पाटील, संदीप पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडाशिक्षक संग्राम भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.