कोल्हापूर

कोवाड - हत्ती

CD

01914
कागणी ः कागणी येथील तारिहाळकर यांच्या शेतातील हत्तीच्या पायाचे ठसे.
...
हत्ती चिंचणे जंगलात परतला
तब्बल १६ दिवसानंतर सोडली जागाः पायाच्या ठश्यावरुन वनविभागाने काढला माग
कोवाड, ता. १० ः महिपाळगडाच्या जंगलात स्थिरावलेल्या हत्तीने तब्बल १६ दिवसानंतर जागा सोडली. शनिवारी रात्री कल्याणपूर, कागणी, कालकुंद्रीमार्गे हत्ती चिंचणे जंगलात गेल्याची अधिकृत माहिती वनविभागाने दिली. हत्तीने रात्रभर प्रवास केल्याने पायाच्या ठश्यावरुन वनविभागाने हत्तीचे चिंचणे जंगलापर्यंत शोधकार्य केले. हत्ती दुसऱ्यांदा चिंचणे जंगलात परत गेल्याने सीमाभागातील लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
हत्ती २४ फेब्रुवारीला मासेवाडीतून चिंचणे जंगलात आला होता. तिथून तो किटवाडमार्गे महिपाळगडाच्या जंगलात स्थिरावला होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याने सीमाभागात धुमाकूळ घातला होता. बेळगांव शहरापर्यंत त्याने मजल मारली होती. भर दिवसा बेकिनकेरे गावातून त्याने दहशत निर्माण केली होती. ठिकठिकाणी त्याने शेती पिकांचे व शेती उपयोगी साहित्यांची नासधूस केली. हत्तीमुळे सीमा भागातील नागरिक भितीखाली होते. अखेर शनिवारी रात्री हत्ती कौलगेमधून दोन वाजता कल्याणपूर फाट्यावरील अमृत पाटील यांच्या रसवंती गृहाजवळील उसाची चिपाडे खावून कागणीच्या शिवारात गेला. जगन्नाथ देसाई यांच्या जोंधळा पिकाचे त्याने नुकसान केले. परशराम तारिहाळकर यांच्या ऊस पिकातून धुडगूस घातला. लोकरु तारिहाळकरांच्या शेतात फणस खाऊन तो अमृत देसाई यांच्या पाण्याच्या टाकीजवळून कालकुंद्रीच्या शिवारात गेला. त्याठिकाणी संजय पाटील यांच्या शेतातील लोखंडी गेट मोडले. सुखदेव उपार यांच्या दोन दुचाकींची मोडतोड केली. रात्री चार वाजता सरस्वती विद्यालयाजवळ नदीपात्राकडे गेल्याचे नागरिकांनी पाहिले. चार वाजल्यापासून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीचा शोध सुरु केला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार व हत्तीच्या पायाच्या ठश्यानुसार हत्तीचा चिंचणेपर्यंतचा सुगावा काढला. त्यामुळे हत्ती चिंचणे जंगलात गेल्याचे वनविभागाने सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे. आर. डिसोजा, एन.एम. धामणकर, आर.बी. पाटील, शुभम बांदेकर, विश्वनाथ नार्वेकर हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
...
कुत्र्याने आवाज दिला अन् ...
‘रात्रीचे दोन वाजले होते. मोठा आवाज आला म्हणून खिडकीतून पाहिले तर समोर भला मोठा हत्ती. आवाज दिला असता तरी जवळपास कोणी नव्हते. हत्तीला पाहताच बोबडी बंद झाली.कंठातून आवाज फुटेना. जिवाची घालमेल झाली. मनात अनेक प्रश्न येऊन गेले. हातपाय गळून गेले होते. काय करावे सुचत नव्हते. सोबतीला असलेल्या कुत्र्याने आवाज दिल्याने हत्तीने जागा सोडली आणि जीव भांड्यात पडल्याचा थरारक प्रसंग कल्याणपूर येथील अमृत पाटील यांनी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT