36260
दुंडगे : परिश्रम विद्यालयात सांस्कृतिक क्लबचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डी. जी. दिवटे, बी. जी. मोकाशी, राजीव सुतार आदी उपस्थित होते.
......................
दुंडगेत सांस्कृतिक क्लबचा प्रारंभ
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील परिश्रम विद्यालयात भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सांस्कृतिक क्लबची स्थापना करण्यात आली. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मा. ना. कुलकर्णी यांच्या नावाने हा क्लब सुरू करण्यात आला आहे. मुख्याध्यापक डी. जी. दिवटे अध्यक्षस्थानी होते. बी. जी. मोकाशी यांच्या हस्ते क्लबचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा साधन व्यक्ती राजीव सुतार या क्लबचे प्रमुख आहेत. ‘भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा व परंपरा’ याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती, सांस्कृतिक ज्ञान मिळवणे, भारतीय कला आणि संस्कृती याबाबत मुलांना संवेदनशील बनविण्याच्या उद्देशाने हा क्लब सुरू करण्यात आला आहे. संस्थेचे सचिव एस. डी. देसाई, ए. आर. कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आर. एस. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. जी. ए. खरात यांनी आभार मानले.
...........
केबल चोरीमुळे निट्टूर परिसरातील शेतकरी त्रस्त
कोवाड ः निट्टूर (ता. चंदगड) येथील पाझर तलाव एकच्या परिसरातील कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. महागडी केबल चोरट्यानी चोरल्याने आतापर्यंत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आठ दिवसांत दोनवेळा केबल चोरीला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पोलिसानी चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी पंपधारकांनी कोवाड पोलिसांकडे केली आहे. कोवाड, निट्टूर, मलतवाडी, कुदनूर, माणगांव परिसरात गेल्या वर्षभरात हजारो मीटर केबल चोरीला गेली आहे. यामध्ये लाखोंच्या घरात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी खन्नेटी येथे दोघा चोरट्याना रंगेहात पकडून शेतकऱ्यानी पोलीसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यानच्या काळात केबल चोरीच्या घटना थांबल्या होत्या; पण पुन्हा महिन्याभरापासून केबल चोरीचे सत्र सुरू झाले आहे.
.....................
‘मंदिरांबरोबरच ज्ञान मंदिरेही टिकावीत’
चंदगड : ‘मजरे कारवे गावाला पुरोगामी विचारधारेची परंपरा आहे. ती जतन करणे सर्वांची जबाबदारी आहे. गावागावात देवतांच्या मंदिरांबरोबरच ज्ञानमंदिरे टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले. आमदार निधीतून उभारलेल्या शाळा खोलीचे तसेच शिनोळी येथील ॲक्वा ॲलॉईज कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधलेल्या सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश बोकडे अध्यक्षस्थानी होते. जोतिबा पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील यांनी जिल्हा परिषदेचा विकास तालुक्यात सर्वत्र पोहोचविणार असल्याचे सांगितले. सभापती विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वप्नाली पाटील, नेहा पाटील, एम. एम. तुपारे, जयश्री हारकारे, मनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जी. एम. बेनके, प्रसाद फाटक, देवाप्पा बोकडे, शिवाजी तुपारे आदी उपस्थित होते.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.