कोल्हापूर

महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम

CD

03314
कोवाड : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात देणगीदारांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष एम. व्ही. पाटील, उपाध्यक्ष प्रा. एन. एस. पाटील व इतर.

महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे
भवितव्य घडविण्याचे काम
अमृतराव देसाई : कोवाडला वर्धापनदिनी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १५ : गेल्या तीन दशकांत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने शिक्षणाची संधी देत विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम केले आहे. महाविद्यालय ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे ज्ञानमंदिर आहे, असे मत माजी मुख्याध्यापक अमृतराव देसाई यांनी व्यक्त केले.
येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा ३१ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. व्ही. पाटील, उपाध्यक्ष प्रा. एन. एस. पाटील उपस्थित होते.
प्राचार्य व्ही. आर. पाटील व शाहू फर्नांडिस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी काशिनाथ कांबळे, धोंडीबा कुट्रे, विजय प्रधान, अनिल पाटील, मारुती बिर्जे, नारायण महागावकर, मधुकर पाटील, जोतिबा वांद्रे, व्ही. के. दळवी या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटील यांनी बहुजन समाजाची शिक्षणाची गरज ओळखून सुरू झालेल्या या महाविद्यालयात आज हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष प्रा. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाला गोविंद प्रभू, डॉ. पी. बी. पाटील, बी. के. पाटील, आप्पा वांद्रे, नरसिंग बाचूळकर, एम. जे. पाटील, शिवाजी आडाव, रामचंद्र व्हन्याळकर, संजीव पाटील, नामदेव पाटील, राणबा तोगले उपस्थित होते. डॉ. आर. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. के. कांबळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST NCMC Card: कार्डधारकांना फटका! एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

'येतेच आता मी नांदायला'साठी झी मराठीची ही मालिका घेणार निरोप? यंदा एकही पुरस्कार नाही, शेवटचा भाग कधी?

Latest Marathi News Live Update : पुणे, अहिल्यानगरनंतर धुळे जिल्हा सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Supreme Court: यंदाच्या दिवळीत फक्त ग्रीन फटाके फोडण्यासच सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; वेळेची मर्यादाही केली निश्चित

शिवसेना नेत्याच्या घरी आढळलं ड्रग्सचं पाकीट, CCTV फुटेजमधून धक्कादायक खुलासा; ASI निलंबित

SCROLL FOR NEXT