Crime Sakal Digital
कोल्हापूर

'माझ्याशी लवशिप कर, नाहीतर...', कोल्हापूरात तरुणाची शालेय मुलीच्या पालकांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ''माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी लवशिप कर. नाहीतर तुला व तुझ्या घरच्या लोकांना जिवंत सोडणार नाही,'' असा मोबाईलवर मेसेज पाठवणाऱ्या युवकाने त्याच्या नातेवाईकांसमवेत शालेय मुलीच्या घरात घुसून तिच्या पालकांना बेदम मारहाण केली. शहराजवळील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित शंतनू निगडे (वय २२) अल्पवयीन शालेय मुलीचा सातत्याने पाठलाग करत होता. ती परीक्षेला जात असताना दुचाकीवरून तिच्या मागे जायचा. त्याने मुलीला मोबाईलवर मेसेज पाठवून तिच्या कुटुंबीयांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. मुलीने मेसेजची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची विचारणा त्याच्याकडे केली. त्यानंतर संशयिताने नातेवाईकांसमवेत मुलीच्या घरात घुसून मारहाण केली.

याप्रकरणी शंतनू सर्जेराव निगडे, शहाजी रामचंद्र निगडे, सोहम शहाजी निगडे, संगीता शहाजी निगडे, अजिंक्य निगडे, सर्जेराव रामचंद्र निगडे, किरण दिवाकर निगडे, शोभा सर्जेराव निगडे, रेखा दिनकर निगडे, अनुराधा निगडे यांच्यावर बेकायदेशीर एकजमाव करून घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: 0.00305%: भारतीय संघाने असा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, जो आता तुटणे जवळपास अशक्यच...

IND vs ENG 5th Test: भारताचे ओपनर माघारी परतले! Shubman Gill ने पुन्हा मैदान गाजवले; गावस्कर, सोबर्स यांचा विक्रम मोडला

Ring of Fire Eclipse Alert: २१ सप्टेंबरचं सूर्यग्रहण या राशींसाठी ठरणार धोक्याची घंटी? पाहा तुमची रास यात आहे का

मालिका संपणार नाहीये आणि लीपही येणार नाहीये... जुई गडकरीची 'ठरलं तर मग' च्या प्रेक्षकांसाठी खास पोस्ट

Latest Maharashtra News Updates : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव

SCROLL FOR NEXT