कोल्हापूर

बाजार समिती निवडणूक

CD

बाजार समिती निवडणुकीसाठी २८ अर्ज दाखल
कोल्हापूर, ता. २८ : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज दिवसभरात एकूण २८ अर्ज दाखल झाले. यात कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातील २३ तर ग्रामपंचायत मतदार संघातील पाच अर्जांचा समावेश आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसह मतदारांनी कंबर कसली आहे. काल (ता. २७) एकूण आठ जणांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. आज दिवसभरात हा आकडा तिप्पट झाला. कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातून सर्वसाधारण प्रतिनिधी गटात १६, महिला प्रतिनिधी दोन, इतर मागासवर्गीय चार तर विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून एक अर्ज दाखल झाला. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटात चार तर अडते व व्यापारी गटात एक अर्ज दाखल झाला आहे.
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण प्रतिनिधी गटातून संतोष धुमाळ, ग्रामपंचायत मतदार संघातील सर्व साधारण प्रतिनिधी गटातून सर्जेराव पाटील तर अडते व व्यापारी गटातून जमीर बागवान यांचे अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दोन दिवसांत दाखल झालेल्या अर्जांचा आकडा ३६ पर्यंत पोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: मुलीवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाई करा: उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,आरोपीला जामीन न मिळावा अशी सरकारकडे मागणी

Solapur Crime: भांडीसंचासाठी मागितली लाच; कंत्राटी दोन ऑपरेटर जेरबंद, माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील घटना!

Latest Marathi News Live Update : गांधीनगर मार्गावरील बेकायदा बांधकामे महापालिका उद्यापासून पाडणार : आयुक्‍त

बंगळूरची फलंदाजी पूर्वपदावर येणार लखनौविरुद्ध आज सामना, फिल सॉल्ट स्पर्धेबाहेर, पण 'हा' स्फोटक फलंदाज घेणार जागा, पहा कशी असेल Playing 11

NCP Rajya Sabha Seat: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेत कोण जाणार? 'ही' नावे चर्चेत; पक्षातील महत्त्वाच्या पदांसाठीही फिल्डिंग

SCROLL FOR NEXT