कोल्हापूर

ग्रंथ प्रकाशन

CD

फोटो - KOP23L99414
...

शाहू विचारांच्या इमारतीचा पाया रचणारा ग्रंथ

श्रीमंत शाहू महाराजः प्राचार्य जे. के. पवार लिखित ''राजर्षी शाहूंची वाड;मयीन स्मारके'' ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर, ता. २९ : ‘राजर्षी शाहूंची वाड;मयीन स्मारके’ हा शाहू विचारांच्या इमारतीचा पाया रचणारा ग्रंथ आहे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.
प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित ''राजर्षी शाहूंची वाड;मयीन स्मारके'' ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. फुलांनी सजवलेल्या पालखीतून ग्रंथ सभागृहात आणण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘इतिहासकारांसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. त्याच्या वाचनाने नेमके काय वाचावे, हे कळण्यास मदत होईल. शाहू राजांचे विचार पुढच्या पिढीला यातून कळतील. आजच्या काळात त्यांचे विचार लोकांत रूजवण्याची वेळ आली आहे. ज्यांनी कोल्हापूर संस्थानला दिशा दिली, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ग्रंथासाठी डॉ. पवार यांनी घेतलेले कष्ट महत्त्वपूर्ण आहेत.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘शाहू कृतज्ञता पर्वातून शाहूंचे कार्य लोकाभिमुख कसे होते, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांच्या विचारांची आज मेजवानी मिळाली असून, यापुढेही शाहू विचार घेऊन काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. भविष्यातील असमतोल संपुष्टात आणण्यासाठी ग्रंथ मार्गदर्शक ठरेल.’
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘शाहूंवर संशोधन करणाऱ्याला हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. एखाद्या संस्थेने काम करावे, तेवढे काम एकट्या जे. के. पवार यांनी केले आहे. केवळ शाहू राजांवरील पुस्तके म्हणजे त्यांचे चरित्र नव्हे. त्यांच्या समकालीन असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णासाहेब लठ्ठे, माधवराव बागल यांची चरित्रे म्हणजेही शाहू चरित्रच आहे. कारण ही व्यक्तिमत्त्वे त्यांचे अनुयायी आहेत.’
इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव म्हणाले, ‘हा ग्रंथ प्रत्येकाने वाचला पाहिजे. या प्रकारे काम करणारे दुर्मिळ आहेत. पवार यांनी १८० पुस्तके कष्टपूर्वक जमा करून हा ग्रंथ साकारला आहे.’ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी रयतेचा राजा बांधावर पोचण्यासाठी लिहिलेला हा ग्रंथ असून, तो सांस्कृतिक चिरंतन ठेवा आहे, असे सांगितले.
डॉ. जे. के. पवार यांनी सद्यस्थितीत वैचारिक प्रदुषणात वाढ होत असून, शाहू राजांचे विचार त्यावर इलाज ठरतील, असे स्पष्ट केले. खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पवार यांच्या पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या. आमदार प्रा. जयंत आसगावकर यावेळी प्रमुख उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.
............

शाहू चरित्र आता रशियन व इटालियन भाषेतही

डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र देशातील पंधरा, तर जगातील दहा भाषांत आणले जात आहे. पैकी आजपर्यंत आठ ते नऊ भाषांत ते भाषांतरित झाले आहे. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी व शिवाजी विद्यापीठातर्फे येत्या ६ मेस रशियन व इटालियन भाषेत चरित्र प्रसिद्ध होत असल्याची माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT