कोल्हापूर

विद्यापीठ सिंहावलोकन कार्यक्रम

CD

12746

जी. आय. बागेवाडी कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपद
शिवाजी विद्यापीठात सिंहावलोकन उपक्रम; १६ महाविद्यालयांतील साडेचारशे विद्यार्थी सहभागी

कोल्हापूर, ता. २९ : विद्यापीठीय शिक्षण घेऊन व्यवस्थापनशास्त्राचे ‘मास्टर’ बनण्यासह अधिक कलाकौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी ‘मास्टरपीस’ बनावे, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातर्फे आयोजित ‘सिंहावलोकन २०२३’ एकदिवसीय व्यवस्थापन कार्यक्रमाच्या उद् घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपक्रमांत अधिविभागासह विविध १६ महाविद्यालयांतील ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. दरम्यान, सिंहावलोकन उपक्रमाचे सर्वसाधारण विजेतेपद निपाणीतील केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी कॉलेजच्या बीबीएच्या चमूने पटकावले. त्यांनी ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले.
डॉ. पाटील म्हणाले, ‘जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी असेल तरच जीवनात यशस्वी होता येते. सिंहावलोकन व्यवस्थापन कार्यक्रमातील बिझनेस प्लॅन, बिझनेस क्विझ, ॲड सम्राट, ॲड मॅड शो, रायझिंग बुल्स स्पर्धांमुळे गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी आहे.’
डॉ. अण्णासाहेब गुरव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दीपा इंगवले यांनी आभार मानले. याप्रसंगी यावेळी शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फाऊंडेशनचे डॉ. प्रकाश राऊत, डॉ. रामदास बोलके, डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे व दीपाली पाटील उपस्थित होते.
आयोजनासाठी भारत डेअरीचे (स्फूर्ती) संचालक धवल मेहता, हर्षद भोसले (फॅशन टॅग, राजारामपुरी), शुभम उडाळे (फोटोग्राफी), सीए ए. एस. पाटील, पेटीएम वेल्थ सेंटर, धनश्री पब्लीकेशन, ॲड ऑन मल्टिसर्व्हीसेस, गेट ॲक्टीव्ह डिझायनिंगचे सहकार्य मिळाले.

विविध स्पर्धा व विजेते अनुक्रमे असे :
बिझनेस क्वीझ- द आयक्यू वॉर - रिशी झा व सोहम करंबळेकर (केएलई सोसायटी बीबीए कॉलेज, निपाणी), श्रध्दा शिंदे व कावेरी सावंत.
* चातुर्य बिझनेस प्लॅन : सूरज कांबळे, सोहम करंबळेकर (केएलई सोसायटी बीबीए कॉलेज, निपाणी), रिशी झा आणि सौरभ बेडकर.
* रायझिंग बुल्स स्टॉक ट्रेडिंग : आदित्य पाटील (डीवायपी कॉलेज इंजिनिअरींग, कसबा बावडा), विश्वजीत आबदार.
* पोस्टर प्रेझेंटेशन : भावना जनमाने आणि सृष्टी वागडे, मुस्कान नायकवडी (डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज)
* कार्पोरेट चाणक्य रोल प्ले : संयुक्ता कलांत्री, प्रिती वैष्णव, सुझान डिसुझा (डीकेटीई, इचलकरंजी), जयेश पाटील, मित पगारिया.
* ॲड सम्राट ॲड मॅड शो : स्नेहल चौगुले सायली सरदेसाई, पूजा घाटगे, प्रतीक्षा गायकवाड, ऋतुजा कुंभार (डीकेटीई इचलकरंजी), श्रेयस नवले, अथर्व पाटील, प्रथमेश ठोंबरे, आदित्य धुमाळ (आरआयटी कॉलेज, इस्लामपूर)
*ट्रेझर हंट : एजीपीएम अधिविभाग (शिवाजी विद्यापीठ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT