कोल्हापूर

पाऊस

CD

जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी

कोल्हापूर, ता. २३ : जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात आज मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली. तर, कोल्हापूर शहर आणि परिसरात मात्र हुलकावणी दिली. दरम्यान, काल रात्री हालोंडी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या जोरदार पावसामुळे लग्न मंडप कोसळून पडला. यामध्ये काही लोक जखमी झाले.

जिल्ह्यात काल रात्री जोरदार पावसाने दैना उडवून दिली. हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यात दमदार पाऊस झाला. तर, हालोंडी येथे एक लग्न कार्यासाठी उभारलेला मंडप पडून काही जण जखमीही झाले होते. दरम्यान, आज दिवभर ढगाळ वातावरण होते. उष्माही वाढला होता. त्यामुळे सायंकाळी पाऊस येणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र शहरात पाऊस झाला नाही. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला त्या ठिकाणी खरीपासाठी मशागत करुन ठेवेलेल्या शेतामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन पेरण्यास गती येणार आहे. आज दिवसभर पावसाचे वातावरण होते. मात्र पाऊस आला नाही.
...
आजरा शहर परिसरात पाऊस
आजराः शहर व परिसरात आज वळवाचा पाऊस झाला. सुमारे पाऊण तास पाऊस झाला. पावसामुळे हवेत सुखद गारवा पसरला. आज सकाळ पासून हवेत उष्मा वाढला होता. दुपारनंतर अंधारून आले होते. चार वाजता पावसाला सुरवात झाली. विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT