कोल्हापूर

पोलीस एकत्रित

CD

मोटारीची काच फोडून लॅपटॉप चोरला

कोल्हापूर : येथील सासने ग्राउंडजवळ रस्त्याकडेला उभारलेल्या मोटारीच्या दरवाजाची काच फोडून चोरट्याने लॅपटॉपची बॅग लंपास केली. बॅगेत लॅपटॉपसह मोबाइल, दोन चार्जर, पेन ड्राइव्ह यासह आधार कार्ड, पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याबाबत गारगोटी (ता.भुदरगड) येथील जितेंद्र मोहनराव नाईक यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
.....

महावितरणच्या डीपीमधून ऑइलची चोरी
कोल्हापूर : कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील महावितरणच्या डीपीमधील सुमारे २० हजार रुपयांचे ऑइल चोरट्याने सोमवारी रात्री लंपास केले. याबाबत फारकळंबा येथील संजय चंद्रकांत मर्दाने यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
...................
लाचखोरांना पोलिस कोठडी

कोल्हापूर : २५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या आरोग्य सहायक अधीक्षकासह तिघांना आज न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे (वय ५०, सध्या रा.सुनंदा पार्क, पोद्दार हायस्कूलजवळ, कोल्हापूर, मूळ रा.कासारपुतळे, ता.राधानगरी), वाहन चालक विलास जीवनराव शिंदे (वय ५७) आणि त्याचा मुलगा शिवम विलास शिंदे (वय २२, दोघे सध्या रा.पारगाव, मूळ रा.किणी, ता. हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. छाप्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरांची झडती घेतली असून, काही विशेष माहिती हाती लागली नाही, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT