कोल्हापूर

सीईओंनी रोखली जलजीवांची चौकशी

CD

सीईओंनी रोखली ‘जलजीवन’ची चौकशी

प्रोटोकॉल पाळला नसल्याचा दावा

कोल्हापूर, ३१ : जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या समितीने जिल्हा परिषदेचे सीईओ यांची परवानगी घेतली नाही. म्हणून सीइओ यांनी ‘जलजीवन’ ची चौकशी तात्पुरती रोखली.
याबाबत जिल्हा परिषदेतून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून चौकशी समिती नेमण्यात आली. जीवन प्राधिकरणच्या सांगली विभागाच्या अधीक्षक अभियंता एस. बी. नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची ही समिती आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता अमित पाथरवट हे सचिव आहेत. कार्यकारी अभियंता सचिन देशमुख, सहा. अधीक्षक अरुण भंडारे, उपअभियंता डी. आर. पाटील व जि. प. वित्त विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी सुनील बंडगर यांचा समितीमध्ये समावेश आहे.
समितीचे सदस्य आज सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत आले. यावेळी ते पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या दालनात जाऊन बसले. जोपर्यंत आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेत नाही तोपर्यंत आपल्याला चौकशी करता येणार नाही, असे समिती सदस्यांना सांगण्यात आले. सीईओंनी तसा निरोप पाठवला. त्यामुळे चौकशी समिती सदस्य जिल्हा परिषदेतून निघून गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT