कोल्हापूर

ध्वनिफीत प्रदशिर्त कार्यक्रम

CD

06413

शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे
संयोगिताराजे छत्रपती; ‘रायगडची गाथा’ लघुपटाचे प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : सहा जूनला होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी आज येथे केले.
शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी निर्मित ‘रायगडची गाथा’ लघुपटाच्या प्रदर्शनाप्रसंगी त्या बोलत होत्या. रिलायन्स मॉलमध्ये कार्यक्रम झाला.
संयोगिताराजे म्हणाल्या, ‘‘छत्रपती घराण्याची सून म्हणून मी शिवछत्रपतींच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे चालवत नाही. मुळातच मी शिवभक्त असून, त्याचे श्रेय संभाजीराजेंना जाते. आयुष्यातील प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मला शिवचरित्रातून मिळाले आहे. यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वे वर्ष सुरू होत असून, वैविध्यपूर्ण उपक्रमांनी तो साजरा केला जाणार आहे. शिवभक्तांनी त्यात सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.’’
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत म्हणाले, ‘‘शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव झाला आहे. यंदा चार लाख शिवभक्त गडावर येतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने जय्यत तयारी केली आहे.’’
दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी डॉ. नायकवडी लिखित गडावरील गीत स्थळ व घटनांचे योग्य वर्णन करणारे असल्याचे सांगितले. डॉ. मनीषा नायकवडी, रमेश पाळेकर, प्रथमेश पाळेकर, प्रा. विनय पाटील, अमर वाईंगडे, ओंकार सुतार, युवराज पुजारी, रोहित भारती, केदार लोहार, मनीषा नायकवडी, अमोल पाटणकर, तुषार भोसले, कैवल्य पाटील,‌ सचिन लोकरे, शशिन कुंभोजकर, हणमंत चौगले, रूपा क्षारबिद्रे यांचा सत्कार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT