कोल्हापूर

सॅटर्डे क्लब कार्यक्रम

CD

24207
...

उद्योजकांनी प्रकल्प समर्थनार्थ पुढे यावे

उद्योगमंत्री उदय सामंतः सॅटर्डे क्लबतर्फे अण्णासाहेब चकोते, कृष्णराज महाडिक यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : ‘एखाद्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्वयंघोषित पुढाऱ्यांचे दुकान बंद करण्यासाठी उद्योजकांच्या यूथ फोरमने पुढाकार घ्यावा’, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. उद्योजकांनी प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे उद्योजक अण्णासाहेब चकोते व कृष्णराज महाडिक यांना उद्योगरत्न पुरस्काराने आज गौरविण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रम झाला.
मंत्री सामंत म्हणाले, ‘एखादा प्रकल्प शहरात आणायचा म्हटल्यानंतर स्वयंघोषित पुढारी विरोधासाठी तयार होतात. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यास याच्याशी मी सहमत आहे. मात्र, तो होत नसतानाही कोणी प्रकल्पाला विरोध करत असेल तर उद्योजकांनी प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी पुढे यावे. तरच स्वयंघोषितांचे दुकान बंद होईल. जिल्ह्याजिल्ह्यांत उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमुळे उद्योजकांची मानसिकता बदलत असून, त्यातून उद्योग क्षेत्राला बळ मिळत आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘उद्योग क्षेत्र हे एक कुटुंब आहे. जो उद्योजक अडचणीत आहे, त्याला मदत करण्यासाठी अन्य उद्योजक पुढे येतात. एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर सवलती, वीज व पाणी स्वस्तात द्या, अशा उद्योजकाच्या मागण्या असतात. मी मंत्री झाल्यानंतर उद्योजकांना ॲंटी चेंबरमध्ये न बोलवता त्यांच्या हिताचा निर्णय घेतला. नऊ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक असणारा ह्युंदाई प्रकल्प महाराष्ट्रात सुरू व्हावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यातून येथील मुलांना रोजगार उपलब्ध होईल.’
खासदार धनंजय महाडिक यांनी उद्योजकांना घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. कृष्णराज व श्री. चकोते यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी क्लबचे सेक्रेटरी जनरल विनित बनसोडे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, सॅटर्डे क्लबच्या कोल्हापूर चॅप्टरचे पिराजी पाटील, डेप्युटी रिजन हेड निलेश पाटील व योगेश देशपांडे, माजी रिजन हेड हर्षवर्धन भुरके, संचालक मिलिंद पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, श्रीकृष्ण पाटील, विशाल मंडलिक, टी. आर. पाटील, डॉ. मिलिंद परीख, सिद्धेश मोहिते उपस्थित होते.
---
एमआयडीसीतर्फे ८५० हेक्टर जागा
संपादन करण्याची प्रक्रिया सुरू

राज्य शासनातर्फे पहिला उद्योगरत्न पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना देण्यात येणार आहे, असे सांगत श्री. सामंत यांनी कोल्हापुरात उद्योग यायला हवेत, अशी उद्योजकांना विनंती केली असून, एमआयडीसीतर्फे ८५० हेक्टर जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT