कोल्हापूर

श्रीक्षेत्र ज्योतिबा प्राधिकरण विकास आराखडा बातमी

CD

जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा
बनवताना स्थानिकांना विश्वासात घ्या

परिसरातील सरपंच, उपसरपंच यांची मागणी

कोल्हापूर, ता. २०: श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानाचा विकास करण्यासाठी आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. यासाठी श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. हे प्राधिकरण बनवताना आमदार विनय कोरे यांच्यासह स्थानिक गावांचे सरपंच, उपसरपंच यांना विश्वासात घ्यावे. त्यांना प्राधिकरण समितीमध्ये सदस्य म्हणून घ्यावे, अशी मागणी जोतिबा परिसरातील गावांमधील सरपंच, उपसरपंच यांनी केली आहे. याबाबतची बैठक आज त्यांनी घेतली.
श्री जोतिबा देवस्थान येथे विकासकामे करण्यासाठी प्राधिकरण बनवण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा बनवण्याची स्पर्धा घेतली आहे. सुमारे सोळाशे कोटी रुपयांपर्यंत हे आराखडे बनवले जाणार आहेत. अद्याप प्राधिकरण नेमण्याचा शासन आदेश निघालेला नाही.
दरम्यान, आज झालेल्या सरपंच, उपसरपंच यांच्या बैठकीत स्थानिक लोकांची गरज, नागरी सुविधांची आवश्यकता, जत्रा-यात्रा यांचे व्यवस्थापन याचा विचार करून आराखडा बनवावा. त्यासाठी बनवण्यात येणाऱ्या प्राधिकरणामध्ये आमदार कोरे यांच्यासह स्थानिक सरपंच, उपसरपंचांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात यावे, अशी भूमिका मांडली.
जनसुराज्य पक्षाचे नेते विजयसिंह जाधव, जोतिबा उपसरपंच शिवाजी सांगळे, कुशिरे सरपंच बाळासाहेब माने, जाफळे सरपंच सुमन पाटील, गिरोली उपसरपंच आनंद पाटील, पोहाळे सरपंच सुरेखा मोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT