‘सॅफ- डीएसटी’ कार्यक्षम व प्रभावी ः प्रा. ली
कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठाची सॅफ- डीएसटी यंत्रणा अत्यंत कार्यक्षम व प्रभावी सुविधा असलेली आहे’, अशा शब्दांत दक्षिण कोरियातील डोंगगुक युनिव्हर्सिटीचे प्रा. जे-जून ली यांनी सॅफ- डीएसटीचे कौतुक केले. गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देणारी ही सुविधा असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्सतर्फे आयोजित ‘मीट द सायंटिस्ट’ कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी सॅफ- डीएसटी केंद्राला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. प्रा.ली यांनी इतकी अत्याधुनिक उपकरणे एकाच छताखाली सुव्यवस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी सॅफ- डीएसटीचे प्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे, स्कूल ऑफ नॅनोसायन्सचे डॉ. हेमराज यादव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.