47970
बहुजनांचे शिक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न
जयंत आसगावकर ः कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे पुरस्कारांचे वितरण
कोल्हापूर, ता. २८ : शिक्षण प्रक्रियेतील सध्याची स्थित्यंतरे स्वीकारून शिक्षक बदल स्वीकारत आहेत; पण शासनाचे काही जाचक, अहिताचे निर्णयाला सातत्याने विरोध करून बहुजनांचे शिक्षण टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.
कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील उपक्रमशील १५ शिक्षक आणि विशेष कार्य करणाऱ्या ८ जणांना पुरस्कार देऊन गौरविले.
आसगावकर म्हणाले, ‘दरवर्षी महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त समाजात आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून शिक्षण व्यवस्थेला ऊर्जा देणारे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे.’ प्रा.डॉ.अरुण शिंदे, आकाश तांबे यांनी मार्गदर्शन केले.
नामदेव कांबळे, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक गौतम वर्धन यांनी केले. आभार संजय कुर्डुकर यांनी मानले.
चौकट
आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी
दिनकर परीट, राजेंद्र जाधव, मनीषा सुतार, अमीत मुंजारे, अशोक कांबळे , बाबासो कांबळे, सुरेश जाधव, सुखदेव कदम, तानाजी कांबळे, अमित मेधावी, अश्विनी कांबळे, बापू सोरटे, महादेव कांबळे, श्रीकांत कांबळे, अनंत कांबळे.
चौकट
विशेष पुरस्कार विजेते
ऐश्वर्या जाधव - उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार, अन्वी घाटगे - उत्कृष्ट जागतीक बाल गिर्यारोहक, संदिप कांबळे - उत्कृष्ट बौद्धाचार्य, मिलींद चंद्रमणी,आदित्य जगदीश, श्रीधन प्रधान, दिव्या दयानंद कांबळे, धैर्यशील कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.