कोल्हापूर

योजना पोचवा संघटन मजबूत करा : केंद्रीय मंत्री कृपाशंकर सिंह

CD

14424
कोल्हापूरः कृपाशंकर सिंह यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
...
कोल्हापूर, हातकणंगलेसह साताराही भाजपला मिळेल
कृपाशंकर सिंह यांचा विश्वासः लोकसभा निवडणूक तयारीचा घेतला आढावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासह हातकणंगले आणि सातारा लोकसभा मतदारसंघही भारतीय जनता पक्षाने लढवावेत, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या जागा भाजपला मिळतील’, असा विश्वास भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला. निवडणूक जिंकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवा. योजनांचे लाभार्थी वाढवा. गाव पातळीपर्यंत पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज ते कोल्हापुरात आले होते. पक्ष कार्यालयात त्यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
बैठकीच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रदेश सचिव महेश जाधव यांनी कृपाशंकर सिंह यांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला. खासदार धनंजय महाडिक यांनी लालकृष्ण अडवानी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी तिन्ही जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला.
कृपाशंकरसिंह म्हणाले, ‘जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ आणि साताऱ्याची जागा भाजपने कमळ चिन्हावर लढवावी यासाठी आग्रही आहेत. या जागा भाजपला मिळाव्यात यासाठी प्रदेशस्तरावर हालचाली सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवाव्यात. अधिकाधिक लाभार्थी बनवावेत. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत आपले संघटन मजबूत करावे.’
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, समरजीतसिंह घाटगे, सातारा लोकसभा निवडणूक प्रमुख अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र विभाग संयोजक योगेश बाचल, राहुल चिकोडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT