कोल्हापूर

शिवराज्याभिषेक बैठक

CD

फोटो 83411

३५० वा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव साजरा करणार
वसंतराव मुळीक : मिरवणुकीत ३५० बाल शिवाजींसह जिजाऊंच्या वेशभूषेत बालचमूंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : शिवछत्रपतींचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव म्हणून वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला जाईल. मिरवणुकीत ३५० बाल शिवाजींसह जिजाऊंच्या वेशभूषेत बालचमू सहभागी होईल. यावेळी शिवराज्याभिषेकाची साडे तीन हजार चित्रे जिल्हाभर वाटण्यात येणार असून, कोल्हापूरकरांच्या एकजुटीतून शिवरायांच्या विचारांचा जागर घालण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी आज येथे केले.
मराठा महासंघ व राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे ६ जूनला होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉलमध्ये बैठक झाली.
मुळीक म्हणाले, ‘‘शिवरायांनी महाराष्ट्र धर्माची स्थापना केली असून, त्यांचा विचार घराघरांत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. शिवराज्याभिषेकानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले जाणार असून, ३५० रोपटी लावण्यात येणार आहेत. मिरवणुकीत लेझीम, मर्दानी खेळ, घोडेस्वार यांचा समावेश असेल. बेळगावमधील मिरवणुकीप्रमाणे शिस्तबद्ध मिरवणूक काढली जाईल.’’
कादर मलबारी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सामाजिक एकतेला धक्का लावण्याचे काम केले जात आहे. शिवराज्याभिषेकाला कोणी विरोध केला, याचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यापद्धतीचे नाटक मिरवणुकीत सादर केले जावे. तसेच नेहरू हायस्कूलमधील दहा-वीस बालके बाल शिवाजी व जिजाऊंच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी होतील.’’
यावेळी फिरोज खान, बाबूराव रानगे, शाहीर दिलीप सावंत, शैलजा भोसले, संपत्ती पाटील, संजय पोवार-वाईकर, महेश मछले, संभाजीराव जगदाळे, डी. जी. भास्कर, अशोक भंडारी, उदय देसाई, प्रा. अनिल घाटगे, डॉ. सोपान चौगले, सुभाष जाधव, बाळासाहेब भोसले यांनी सूचना केल्या. शंकरराव शेळके, संपत चव्हाण-पाटील, विजय पाटील, शिवराज गायकवाड, महादेव पाटील उपस्थित होते. सी. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब काळे यांनी आभार मानले.
-------------------
* बैठकीतील सूचना अशा :
- एक हजार वारकरी सहभागी व्हावेत
- गीत शिवराय कार्यक्रमाचे आयोजन करावे
- मिरवणुकीतून समतेचा संदेश द्यावा
- सर्वपक्षीय नेत्यांनी सहभागी व्हावे
- आरमार प्रमुखांचे फलक मिरवणुकीत असावेत
- जलनीतीवरील संदेश देणारे फलक लावावेत
- इतिहासातील अस्सल पुराव्यांचे फलक असावेत
- अठरापगड जाती-धर्मातील लोकांनी वेशभूषेत यावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

Weather Update : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस, अनेक भागात ‘कोसळधार’; आणखी 'किती' दिवस पावसाची शक्यता!

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून; मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली घटना

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT