कोल्हापूर

लाठी काठी उपक्रम

CD

M83721
कोल्हापूर ः गिरगाव येथील संपत दत्तात्रय पाटील यांनी तब्बल बारा तास दुहाती लाठी फिरविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. सोबत त्यांचा आठ वर्षीय मुलगा दक्ष यानेही अडीच तास लाठी फिरविली.

तब्बल बारा तास
भिरभिरली दुहाती लाठी!

गिरगावच्या संपत पाटील यांचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : वय वर्षे चाळीस. अंगात जोम अन् रगही. दोन हातात दोन लाठ्या घेऊन ते उभे राहिले. पहाटे चार वाजता त्यांनी लाठ्या फिरवण्यास सुरुवात केली. हळूहळू तापमान वाढू लागताच त्यांच्या अंगातून घामाच्या धारा सुरू झाल्या. मनातील ऊर्जा मात्र त्यांना थांबवू शकत नव्हती. घड्याळाच्या काट्यांनी दुपारी दोन वाजल्याची जाणीव करुन दिल्यानंतर उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला अन् तब्बल बारा तास दुहाती लाठ्या फिरवण्याचा उपक्रम यशस्वी झाला. करवीर तालुक्यातील गिरगावच्या या खेळाडूचे नाव संपत दत्तात्रय पाटील. संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त हा उपक्रम झाला. पापाची तिकटी येथील संभाजी महाराज स्मारक परिसरात त्याचे आयोजन केले होते. त्यांचा आठ वर्षीय मुलगा दक्ष यानेही त्यात सहभाग घेतला. त्याने अडीच तास लाठी फिरविण्याचा उपक्रम केला. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिगेडचे रुपेश पाटील, धनाजी मोरबाळे, राहुल पाटील, महादेव कांबळे, महेश लोहार, उत्तम पाटील, वस्ताद आनंदा पाटील उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे अश्विन वागळे, अजय शिंदे, शाहीर दिलीप सावंत, विजय साळोखे, ओमकार शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.


चौकट
चौथ्या पिढीतही परंपरा...
रामचंद्र पाटील शिवकालीन युद्धकलेतील वस्ताद. त्यांची परंपरा पांडुरंग पाटील व नातू आनंदा पाटील यांनी सुरू ठेवली. पाटील घराण्यातील संपत पाटील हे चौथ्या पिढीतले. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून युद्धकलेचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. गेले सहा वर्षे ते फाऊंड्रीत कामाला आहेत. तसेच ते शेती कामही करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT