कोल्हापूर

लाडकी बहीण योजनेत जिल्हा अग्रेसर हवा

CD

‘लाडकी बहीण’ योजनेत कोल्हापूर अग्रेसर हवे
जिल्हाधिकारी येडगे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत कार्यक्षमपणे राबवा. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर असला पाहिजे. या दृष्टिकोनातून गाव पातळीपर्यंत चोख नियोजन करा. योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारे गैरकारभार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा,’ अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या योजनेसंदर्भात आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यातील ताराराणी सभागृहात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. महिलांचा प्रतिसाद लक्षात घेऊन योजनेच्या अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आवश्यक ती कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसीलदार कार्यालयात कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाहीत, दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्या. योजनेसाठी ‘नारी शक्ती दुत’ ॲपवर निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. तसेच योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा अर्ज भरून देण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची मदत घेऊ नका. कोणतीही अडचण आल्यास नागरिकांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.’
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
...
अंगणवाडी सेविकांचा सहभाग
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी ५० रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी अधिकाधिक महिलांना लाभार्थी करून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT