कोल्हापूर

सुब्रोतो मुखर्जी चषकावर उषाराजेचे नाव

CD

15171

सुब्रोतो मुखर्जी चषकावर ‘उषाराजे’चे नाव
सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा; अंतिम सामन्यात पोदार स्कूल पराभूत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ : सतरा वर्षांखालील सुब्रोतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये उषाराजे गर्ल्स हायस्कूलने पोदार स्कूलचा एक विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत विजेतेपद पटकावले. हा विजयी गोल संयोगिता शिंदे हिने नोंदविला.
विभागीय क्रीडा संकुलात कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आज सकाळी उपांत्य फेरीत पोदार स्कूलने भाई माधवराव बागल हायस्कूलचा दोन विरुद्ध शून्य गोल ने पराभव केला. पोदार स्कूलकडून समृद्धी पोतदार, निधी मोहिते यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.
भाई माधवराव बागल हायस्कूलने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा टायब्रेकरवर दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत तिसरा क्रमांक पटकाविला. उषाराजे विजय संघात युगंधरा चौगले, संस्कृती तुरुके, सई धनवडे, सई बोरनाक, लावण्या चव्हाण, सायली देवणे, नताशा पवार, वैष्णवी पोवार, अमरीन शेख, संयोगिता शिंदे, आर्या कांबळे, रिचा सावंत, दीक्षिता निवतकर, अवंती माने, जानवी पाटील, अवनी उत्तुरकर, सई नलवडे व क्रीडाशिक्षक रघू पाटील यांचा समावेश होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ आशीष मांडवकर, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सॉकर रेफ्री असोसिएशनचे सचिव प्रदीप साळोखे, क्रीडाशिक्षक सचिन शिंदे, सुरेश चव्हाण यांच्याहस्ते झाला.
................
पंधरा वर्षांखालील मुले निकाल असा,
स. म. लोहिया हायस्कूलने भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलचा चार विरुद्ध तीन गोलने पराभव केला. भाई माधवराव बागल हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसई संघाचा चार विरुद्ध दोन गोलने टायब्रेकरवर पराभव केला. न्यू हायस्कूलने माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी एक विरुद्ध शून्य गोलने मात केली. हा विजयी गोल स्वरूप गायकवाड याने नोंदविला. राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलने प्रायव्हेट हायस्कूलचा तीन विरुद्ध शून्य गोलने ब्रेकरवर मात केली. हा सामना संपूर्ण वेळेत एक - एक असा बरोबरीत राहिला. शांतिनिकेतन स्कूलने विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. साद मुल्ला दोन, तर कनिष्ठ भालकर याने एक गोलची नोंद केली.
अखेरच्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा चार विरुद्ध शून्य गोल असा पराभव केला. वेदांत गाडगीळने दोन, तर श्लोक खांडके, हर्षवर्धन इंजर यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

मृत्यू समोर उभा…पण टीसी देवदूत ठरला; प्रवाशाचा 3 सेकंदात जीव वाचला, रेल्वे स्थानकावर थरारक प्रसंग, पाहा Video

Amravati Crime : डोक्यावर गोळी झाडून क्यूआरटी जवानाची आत्महत्या; पोलिस आयुक्तालयाच्या बेसमेंटमधील घटनेमुळे खळबळ

Mumbai News : गुटखा-हुक्का प्रकरणात विभागाची वादग्रस्त भूमिका; जप्त माल सोडण्यास परवानगी, अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह

Nagpur News : महिलेच्या पोटातून काढला १३ किलो वजनाचा फुटबॉलच्या आकाराचा ट्यूमर

SCROLL FOR NEXT