कोल्हापूर

विनेश फोगट संवाद

CD

फोटो - KOP24N25924
कोल्हापूर : कोल्हापूर हायस्कूलातील ज्यूदो हॉलमध्ये रविवारी खेळाडूंशी संवाद साधताना विनेश फोगट. शेजारी आनंद माने, नितीन दलवाई, राजेंद्र रायकर, नारायण सुतार.

तर क्रीडा संघटनेतून राजकारण्यांना दूर ठेवू
विनेश फोगट ः बदलांवर विश्‍वास ठेवत सराव करा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राजकारण्यांना राज्य क्रीडा संघटनेपासून दूर ठेवत खेळाडूंचा समावेश करू, अशी ग्वाही कुस्तीपटू आणि आमदार विनेश फोगट यांनी आज येथे खेळाडूंना दिली. कोल्हापूर हायस्कूलमधील ज्युदो हॉलला त्यांनी भेट देत खेळाडूंशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, ‘‘गुणवत्तेला वाव देत असताना पराभवाने खचू नका. भीती नष्ट होण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. खेळात कोणतेही दडपण घेऊ नका. तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम आम्ही करू. अॅथेलिटसना प्रोत्साहन मिळत नाही. त्यांच्यात गुणवत्ता असूनही प्रशिक्षक, आहार तज्ज्ञ चांगला मिळत नाही. या परिस्थितीत खेळाडूंनी स्वप्ने पाहताना वास्तवाशी नाळ तोडू नये. स्वत:ला सिद्ध करण्याचे प्रयत्न ठेवावेत. पराभव पचविण्याची क्षमता आहे, त्याच्या पाठीशी परमेश्वर राहतो. सरावात स्मार्ट वर्क करताना प्रत्येक क्रीडा प्रकारांतील खेळाडूंनी एकमेकांना साथ द्यावी. मी गेल्या दहा वर्षांत कधीच जोर-बैठकांचा व्यायाम केला नाही. बदलांवर विश्‍वास ठेवत सराव करा.’’
त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रातील खेळाडूंत गुणवत्ता आहे. मात्र, त्यावर काम केले जात नाही. महाराष्ट्रात मुलींना कुटुंबीयांकडून खेळात प्रोत्साहन मिळते, हे चांगले आहे. अन्याय होतोय, तेथे आपण लढाई करू. थेट मैदानात जाऊन आपला हक्क खाणाऱ्यांविरुद्ध लढू. मी आता राजकारणात असले तरी मनाने खेळाडू आहे.’’
यावेळी ॲड. सुरमंजिरी लाटकर, आनंद माने, नितीन दलवाई, उमेश पोवार, ज्यूदो प्रशिक्षक संतोष बाबर, तलवारबाजी प्रशिक्षक विनय जाधव, ऋषिकेश पाटील, राजेंद्र रायकर, नारायण सुतार, संदीप पाटील, दीपक पाटील उपस्थित होते.

चौकट
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही विनेश यांनी दिली. ज्यूदोपटू यशस्विनी जाधव हिने देशासाठी मी ऑलिंम्पिकमध्ये कधी खेळेन, असा प्रश्‍न केला. त्यावर जिंकण्याची मानसिकता ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.

कोट
चौदा वर्षांची असताना मी राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाले होते. अन्यायाविरुद्ध आंदोलन करत असताना मी रडत होते. खेळ व देश सोडण्याचा विचार मनात आला होता. मात्र, प्रियांका गांधी यांनी अन्यायी लोकांना हरविण्याचा सल्ला दिला आणि मी लगेच कुस्तीचा सराव सुरू केला.
- विनेश फोगट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी पुणे ते दुबई विमान रद्द

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

SCROLL FOR NEXT