कोल्हापूर

समर यूथ समीट

CD

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर आवृत्तीसाठी आवश्‍यकच...

यिनचा नवीन लोगो

समर यूथ समीट अवघ्या तीन दिवसांवर
३ व ४ जूनला आयोजन; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत उत्कंठा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) समर यूथ समीट अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत त्याची उत्कंठा असून, विविध वक्त्यांची भाषणे ऐकण्यासाठी ते उत्सुक आहेत. समीटमधून नवे विचार घेऊन नवी भरारी घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे. हे समीट ३ व ४ जूनला होत आहे. डॉ. पियू हाईट क्लिनिक समीटचे मुख्य प्रायोजक असून, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पॉवर्ड बाय हे समीट आहे. विद्याप्रबोधिनी यांच्या सहकार्याने ते होत आहे. ट्रिनिटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, फ्युएल बिझनेस स्कूल, महा एनजीओ फेडरेशन सहप्रायोजक, शिवाजी विद्यापीठ व्हेन्यू, संजीवन नॉलेज सिटी (पन्हाळा) हॉस्पिटॅलिटी, तर जनता सहकारी बँक लिमिटेड बँकिंग पार्टनर आहे. विद्यापीठातील राजमाता जिजाऊ बहुद्देशीय सभागृहात त्याचे आयोजन केले आहे.
----------
16979
सर्व विद्यार्थ्यांना आग्रहपूर्वक आवाहन करतो की, तुम्ही या समीटमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या. नवीन गोष्टी शिका आणि अनुभवातून स्वतःला समृद्ध करा. हे यूथ समर समीट तुमच्या आयुष्याला आकार देणारे आहे. त्यातून तुमचे व्यक्तिमत्त्व घडवू शकता.
- डॉ. युवराज गुरव, प्राचार्य, अशोकराव माने पॉलिटेक्निक, वाठार तर्फ वडगाव
--
16978
समर यूथ समीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि प्रशासकीय विभागातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील काळात योग्य दिशा नक्कीच मिळेल. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विचारांची देवाण-घेवाण करावी.
- डॉ. अब्दुलरशीद चंद अत्तार, प्राचार्य, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा
--
16983
यूथ समर समीट म्हणजे नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, नवचैतन्य, उद्योजकता आणि सामाजिक जाणीव या सर्व गोष्टींचा संगम आहे. विविध कार्यशाळा, चर्चासत्रे आणि मनोरंजक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना चालना मिळेल आणि ते एक जबाबदार आणि सशक्त नागरिक घडतील.
- दयानंद पाटील, यिन अध्यक्ष, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, वाठार
----------------
16984
समर यूथ समीटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. विविध कार्यशाळा, सत्रे आणि चर्चांमधून शिकण्यासारखे खूप मिळणार आहे. हे व्यासपीठ कौशल्यांना आकार देणारे आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरेल, याची खात्री आहे. सर्वजण उत्साहात या उपक्रमात सहभागी होत आहोत.
- संगमेश्वर आनेराय, यिन अध्यक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा
-------------
16977
तरुणाईला घडविण्याचे काम यिन करत आहे. आता यिनतर्फे यूथ समर समीट होत असून, त्यात वैचारिक वक्त्यांची मांदियाळी जमणार आहे. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणे आवश्‍यक आहे. त्यातून आमच्या व्यक्तिमत्त्वाला आवश्‍यक खाद्य मिळेल.
- अनोश कामत, यिन कोअर टीम अध्यक्ष, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय

16981
यिनच्या सामाजिक उपक्रमांतून सामाजिक उत्तरदायित्त्व म्हणजे काय हे कळू लागले आहे. आता यूथ समर समीटमधून निश्‍चितच आमच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडणार आहेत. त्यासाठी ते कधी सुरू होणार, याच्या प्रतीक्षेत आहोत.
- अंकिता वडेर, यिन अध्यक्ष, भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, सांगली
------------------
नोंदणीसाठी संपर्क
समर यूथ समीटसाठी नाव नोंदणी करण्यासाठी ९९९ रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. यात कॉलेज सॅक, डायरी, प्रमाणपत्र, चहा व नाश्‍ता, जेवण, निवास व्यवस्था, ओळखपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी यिन सहायक व्यवस्थापक (पश्‍चिम महाराष्ट्र) अवधूत गायकवाड (९९७५१३१२७०) यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, यिन समन्वयक ऋषिकेश मोरे (९९२३७५१७६०) सातारा, तर यिन समन्वयक अभिजित शिंदे (९९६०७९७३०७) यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Kulwant Khejroliya? वेटर ते IPL 2026... कुलवंतला मोठ्या सामन्यात GT ने दिली संधी, माजी खेळाडूलाच RCB विरुद्ध उतरवले...

Sagargad History : सागरगडावर लागला प्राचीन विहिरीचा शोध; छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गडावरील 'ती' जागा पाहून दुर्गप्रेमीही थक्क...

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

SCROLL FOR NEXT