कोल्हापूर

नेमबाजी स्पर्धेत वेध अकॅडमीची यश

CD

वेध अकॅडमीला नेमबाजीत
सहा सुवर्णांसह १३ पदके

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : कोल्हापूर महापालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने सुरू असलेल्या वेध रायफल व पिस्तूल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. अकॅडमीच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण, ६ रौप्य आणि एका ब्राँझपदकासह एकूण १३ पदकांची कमाई केली.
सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये अवंतिका लोहार (१४ वर्षांखालील मुली, ओपन साईट एअर रायफल), भार्गवी पाटील (१७ वर्षांखालील मुली, ओपन साईट एअर रायफल), हिरण्या सासने (१७ वर्षांखालील मुली, पीप साईट एअर रायफल), वरदराज पवार (१९ वर्षांखालील मुले, पीप साईट एअर रायफल), अदिती भंडारी (१९ वर्षांखालील मुली, ओपन साईट एअर रायफल) आणि अग्रझा जाधव (१९ वर्षांखालील मुली, ओपन साईट एअर रायफल) यांचा समावेश आहे. तर ऋग्वेद खोत (१४ वर्षांखालील मुले, ओपन साईट एअर रायफल), सान्वी घाटगे (१४ वर्षांखालील मुली, ओपन साईट एअर रायफल), तीर्थ पवार (१७ वर्षांखालील मुले, पीप साईट एअर रायफल), व्यंकटेश पाटील (१९ वर्षांखालील मुले, पीप साईट एअर रायफल), परी डोईफोडे (१९ वर्षांखालील मुली, पीप साईट एअर रायफल) आणि स्नेहांकिता चौगुले (१९ वर्षांखालील मुली, ओपन साईट एअर रायफल) यांचा समावेश आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या पीप साईट एअर रायफल प्रकारात शर्व घुगरे याने ब्राँझपदक मिळविले.
सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय नेमबाज व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या राधिका बराले-हवालदार, रोहित हवालदार आणि धैर्यशील देसाई यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT