कोल्हापूर

कुरुंदवाडला चार दुकानगाळे सील

CD

कुरुंदवाडला चार दुकानगाळे सील
घरफाळा थकबाकी वसुली मोहिम पालिकेकडून तीव्र
कुरुंदवाड, ता. २७ ः आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येथील पालिकेच्या घरफाळा विभागाने वसुली मोहीम तीव्र केली आहे. दहा हजारपेक्षा जास्त थकबाकी असलेली माळभाग येथील चार दुकानगाळे सील केले. बागवान गल्लीतील संभाजी घारे यांच्यावर ही पथकाने थकीत घरफाळाप्रश्नी कारवाई केली.
मार्चअखेर पालिकेच्या सर्वच विभागाच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने थकीत रकमेप्रश्नी कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी दिले आहेत. त्यानुसार घरफाळा व पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम तीव्र करताना मिळकती सील अथवा पाणी कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. सोमवारी संभाजी घारे यांच्याकडे ११ हजार रुपये थकबाकी असल्याने सि. स. क्र १७५८, १७५९ ही मिळकत घरफाळा विभागाच्या पथकाने सील केली.
माळभाग येथील चार दुकान गाळ्यांची पोटकुळ ठेऊन भाड्याने दिलेल्या मिळकतीची दोन वर्षांपासूनचा साठ हजार रुपये कर थकीत असल्याने गाळे सील केले. कर विभागाचे निशिकांत ढाले, दिनेश हाताळगे, शशिकांत कडाळे, यांच्या पथकांने ही कारवाई केली.
--------------
शहरातील घरफाळा पाणीपट्टी व अन्य कराच्या रक्कमा भरून नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करून होणाऱ्या कारवाया टाळाव्यात. वसुलीचे उद्धिष्ट पूर्ण करून विकासाला चालना द्यावी.
-आशिष चौहान, मुख्याधिकारी, कुरुंदवाड पालिका

.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT