कोल्हापूर

मटका किंग टोळी हद्दपार

CD

03458, 03457, 03459
...

कुरुंदवाडमधील ''मटका किंग गॅंग ''चे
सातजण सहा महिन्यांसाठी हद्दपार

कुरुंदवाड, ता.२९ः येथील ''मटका किंग गॅंग '' टोळीचा प्रमुख प्रशांत दिनकर चव्हाण याच्यासह त्याच्या सात साथीदारांना जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. याबाबतचे आदेश नुकतेच काढले आहेत.
हद्दपारीत मटका बुकी मालक चव्हाण याच्यासह नासिर कलंदर बागवान, हमीद आब्बास भाई, गणपती सुगंधराव शिंदे,(सर्व रा.कुरुंदवाड), नंदकुमार तुकाराम मोहीते (रा. भैरववाडी, कुरुंदवाड), बाळू यशवंत चव्हाण (रा. शिरढोण ता. शिरोळ) व अनिल दशरथ गोफने ( रा. आसरानगर, इचलकरंजी) यांचा समावेश आहे.
मटका, जुगार अशा अवैध व्यवसायातून शहर व परिसरात गुन्हेगारीला उत्तेजन दिल्याप्रकरणी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी चव्हाण याच्यासह त्याच्या साथीदारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुखांकडे सादर केला होता. पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अन्वये शनिवार (ता.२८) पासून सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत हद्दपारीची प्रक्रिया येथील पोलिस ठाण्यात सुरू होती. मटका व जुगार प्रकरणातील टोळीला हद्दपार करण्याची येथील पोलिस ठाण्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT