कोल्हापूर

नऊ टक्के कर आकारणी अमान्य

CD

नऊ टक्के कर आकारणी अमान्य
सावगावे, आवळे; कुरुंदवाडची चतुर्थ वार्षिक कर आकारणी
कुरुंदवाड, ता. १९ ः शहराची चतुर्थ वार्षिक कर आकारणी पाच टक्के व्हावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाने ९ टक्के कर आकारणीची घोषणा केली. ती आम्हाला अमान्य असून लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा बैठक घेऊन विभागीय आयुक्तांकडे अपील करणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे व राजू आवळे यांनी दिली.
श्री. सावगावे म्हणाले, ‘घरफाळा माफ व्हावा यासाठी शिवसेना आणि कृती समितीच्या माध्यमातून ऑक्टोबर २०२२ पासून पाठपुरावा करत आंदोलने केली आहेत. आमदार-खासदारांची शिष्टाई करत जिल्हाधिकारी रेखावार यांच्याशी झालेल्या बैठकीत ५ टक्के कर आकारणी करावी, अशी चर्चा झाली होती. अनुदान स्वरूपात एक कोटी रुपये आमदार आणि खासदारांनी देण्याचे आश्वासन दिले आहे. करवाढ ५ टक्के असावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत योग्य तोडगा काढू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, पालिका प्रशासनाने ९ टक्के कर आकारणीची घोषणा करून अन्याय केला आहे. शहराची कर आकारणी ५ टक्केच करावी. यासाठी शिवसेना आणि कृती समितीच्या माध्यमातून व्यापक लढा उभारणार आहे.’ वैभव उगळे, दयानंद मालवेकर, आप्पासाहेब भोसले, राजेंद्र बेले, बबलू पवार आदी उपस्थित होते.
----------
शिवसेना ठाकरे गट आक्रमक
शहरप्रमुख सावगावे आणि आवळे यांनी शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आशिष चौहान यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ५ टक्के कर आकारणी करण्याची मागणी केली होती. योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले असताना ९ टक्के कर आकारणीची घोषणा कशी केली अशी विचारणा केली असता त्रिसदस्यीय समितीला असलेल्या अधिकाराने केल्याचे सांगितले. हा निर्णय आम्हाला अमान्य असल्याचे सांगत श्री. सावगावे व आवळे आक्रमक झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT