Washing Powder Factory Dattawad esakal
कोल्हापूर

Washing Powder Factory : बनावट वॉशिंग पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा; दत्तवाडात 30 टन माल जप्त, दोघे ताब्यात

मुंबई, गुजरात येथील विशेष पथकाने दत्तवाड येथे छापा टाकला.

सकाळ डिजिटल टीम

शेडमध्ये नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरशी नामसाधर्म्याशी मिळतीजुळती पाकिटे आढळली.

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दानवाड मार्गावर पत्र्याचा शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर (Fake Washing Powder) तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई व गुजरात (Gujarat) येथील पथकाने छापा टाकून तब्बल तीस टन बनावट वॉशिंग पावडर व मशिनरी जप्त केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. एका नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरची नामसदृश्य पाकिटे पथकाने जप्त केली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दत्तवाड येथील एका अवैध मटका व जुगार व्यवसायाशी संबधित व्यक्तीच्या शेडमध्ये बनावट वॉशिंग पावडर तयार करून एका नामांकित वॉशिंग पावडरशी नामसाधर्म्य असणाऱ्या पाकिटातून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. अशाच प्रकारच्या बनावट वॉशिंग पावडरचे उत्पादन केल्याप्रकरणी मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) एकाला अटक करण्यात आली आहे.

या अटकेतील संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई, गुजरात येथील विशेष पथकाने दत्तवाड येथे छापा टाकला. त्यावेळी शेडमध्ये नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरशी नामसाधर्म्याशी मिळतीजुळती पाकिटे आढळली. शिवाय वॉशिंग पावडरचा सुमारे ३० टन कच्चा व पक्का माल पथकाच्या हाती लागला. पथकाने मुद्देमाल जप्त करीत दोघांना ताब्यात घेतले आहे.

मध्यप्रदेश ते दत्तवाड कनेक्शन

नामांकित कंपनीच्या वॉशिंग पावडरच्या इंग्रजी अक्षरात डब्‍ल्‍यूच्या ठिकाणी व्ही. व्ही. जोडून या कंपनीच्या नावाची आणि पाकिटाची एकसारखी दिसणारी पाकिटे तयार करून त्यात ही बनावट पावडर भरुरून त्याची विक्री केली जात होती. ही पाकिटे हुबेहूब दिसत असल्याने नामांकित कंपनीने याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार कॉपीराईट अॅक्टचा भंग केल्याकडे लक्ष वेधले होते. न्यायालयाने चौकशीसाठी पथक नेमले व सर्वप्रथम या बनावट वॉशिंग पावडर प्रकरणाच्‍या म्होरक्याला मध्यप्रदेशात गजाआड केले. त्याच्याकडील माहितीवरून पथक दत्तवाडमध्ये आले व येथे छापा टाकून बनावट वॉशिंग पावडरचा पर्दापाश झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT