कोल्हापूर

कुरुंदवाडला बसवेश्‍वर जयंती उत्साहात

CD

04398
कुरुंदवाड : येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त कार्यक्रमात शरण प्रतिमा वितरणप्रसंगी रविराज फडणीस व लिंगायत समाजबांधव.
-------------
कुरुंदवाडला बसवेश्‍वर जयंती उत्साहात
कुरुंदवाड, ता. १० ः शहर व परिसरात महात्मा बसवेश्‍वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील श्री कल्लेश्वर मंदिर येथे कल्लेश्वर महाराज शिवपिंडीस सौ. आणि श्री. महावीर कोप्पे यांच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर म. बसवेश्वर चौक येथे म. बसवेश्वर चौक स्तंभ आणि बसव प्रतिमेचे पूजन कुरुंदवाडचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते झाले.
महात्मा बसवेश्वरांच्या काळात अनुभव मंटपमध्ये कार्यरत असणारे संत शरण मडीवाळ माचिदेव, समगार हरळय्या, हुगार मदय्या, कुंभार गुंडय्या, अंबीगेर चौडय्या, तेली कण्णप्पा, हडपद अप्पण्णा आणि एकांत रामय्या यांच्या प्रतिमांचे वितरण श्री. फडणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. चंद्रकांत मोरे, सदाशिव माळी, दीपक पोमाजे, तानाजी आलासे, संजय डोंगरे, रमेश मिठारे, तातोबा पाटील, कुलदीप कुंभार, बाबू कोळी, नंदकुमार पाटील, ऋषिकेश चौगुले आदी उपस्थित होते. अक्कमहादेवी महिला भजनी मंडळाचे भजन कल्लेश्वर मंदिर येथे झाले. जन्मोत्सव सोहळा दुपारी १२ वाजत‍ा झाला. यावेळी अक्कमहादेवी महिला भजनी मंडळाच्या सदस्या सुनंदा आवटी, विजयमाला आवटी, कांचन मेंगे, प्रेमिला कुंभार, सारिका आवटी, शोभा परीट आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT