कोल्हापूर

पोलिस वृत्त

CD

विजेच्या धक्क्याने
वीटभट्टी कामगाराचा मृत्यू
कुरुंदवाड येथील घटना : मृत कर्नाटकातील
कुरुंदवाड ता. १२ ः विजेचा धक्का लागून वीटभट्टी मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. संजय लक्ष्मण मादर (वय २४, सध्या रा. कुरुंदवाड, मूळगाव शेंगूनाशी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. राघवेंद्र थिएटरनजीकच्या वीटभट्टीवर ही दुर्घटना घडली. याबाबतची वर्दी बसू शिवानंद मादर याने कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संजय मादर हा अनिल कुंभार यांच्या वीटभट्टीवर विटा छपाई करण्यासाठी मजूर म्हणून कामाला होता. रविवारी (ता.१२) सकाळी आंघोळीसाठी पाणी उपसा करण्यासाठी मोटार सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारासाठी तातडीने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, कर्नाटकातून त्य‍ांचे नातेवाईक दुपारी आले. तोपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले होते. मात्र आमच्या अनुपस्थितीत शवविच्छेदन का केले, असा सवाल उपस्थित करत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिस हवालदार विवेक कराडे यांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून घेत नातेवाईकांच्या तक्रारींचे निरसन केल्यानंतर नातेवाईक शांत झाले आणि शववाहिकेतून मृतदेह त्यांच्या गावी पाठवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT