कोल्हापूर

हेरवाडला जयंतीनिमित्त मिरवणूक, मूर्ती प्रतिष्ठापना

CD

हेरवाडला जयंतीनिमित्त
मिरवणूक, मूर्तीची प्रतिष्ठापना
कुरुंदवाड, ता. २३ ः भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला असून प्रज्ञा शील करुणा या त्रिसूत्रीचा प्रत्येकाने अवलंब केला पाहिजे. जगाला सध्या युद्धाची नाही, तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी हेरवाड येथे केले.
हेरवाड (ता. शिरोळ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना समितीतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त मिरवणूक व गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर माळभाग येथे ध्वजवंदन व मूर्तीचे पूजन राजू शेट्टी व दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले. गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. गणपतराव पाटील म्हणाले, ‘भगवान गौतम बुद्धांचे आचार - विचार सर्वांनी जोपासणे गरजेचे आहे.’ दलितमित्र अशोकराव माने, सरपंच रेखा जाधव, दिलीप पाटील, वसंतराव देसाई, माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज, माजी सरपंच सूरगोंडा पाटील, राजू आवळे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एल्फिन्स्टन पूलबधितांना मिळणार बदलून घरे, म्हाडाकडून आणखी १२ घरांचा शोध सुरू

Dhule News : सवलत हवीये? मग खिशात ठेवा 'हे' स्मार्ट कार्ड; एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय

Satara LPG Shortage: एलपीजीअभावी साताऱ्यातील उद्योग ठप्प! कामगारांवर उपासमारीची वेळ; उद्योजकांसमोर खर्च वाढ व तांत्रिक अडचणींचे संकट..

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

SCROLL FOR NEXT