कुरुंदवाडला २२१ दिव्यांग
लाभार्थींना अनुदान वितरण
कुरुंदवाड, ता. ७ : दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून शासनाच्या प्रत्येक योजनेत दिव्यांगांना प्रथम स्थान दिले जाणार असल्याने दिव्यांगाना जगण्याचा आधार व बळ मिळत असल्याचे प्रतिपादन पालिका कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे यांनी केले.
येथील पालिकेच्या तबक उद्यान हॉल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाच टक्के निधीतून २२१ लाभार्थींना अनुदान वितरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात वळवडे बोलत होत्या.कर निरीक्षक स्नेहल सोनाळकर,बांधकाम अभियंता ऋतुजा चौगुले,लेखापाल सविता खोत, अतिश काटकर, शिवमाला भोसले, माजी नगराध्यक्ष दयानंद मालवेकर, प्रहार संघटनेचे सुधाकर तावदारे आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यालय निरीक्षक वळवडे पुढे म्हणाल्या, ‘दिव्यांग बंधूंना पाच टक्के निधीतच न ठेवता पंतप्रधान आवास घरकुल योजना, दिव्यांग व्यावसायिक योजनासह आदी पालिकेच्या योजनेत प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. लाभार्थींनी या योजनांचाही लाभ घ्यावा.’ यावेळी माजी नगराध्यक्ष मालवेकर आयुब पट्टेकरी, प्रसाद माने, अन्वर बारगीर, बांधकाम अभियंता ऋतुजा चौगुले आदींनी मनोगते व्यक्त केली. लाभार्थींना अधिकाऱ्यांच्या हस्ते लाभाचा धनादेश वाटप करण्यात आला. यावेळी संजय पाटील, तानाजी शिकलगार, दत्ता कडोलीकर, बाबासाहेब गावडे, नंदकुमार लोखंडे, सादिक बारगीर, श्रावण मोरस्कर यांच्यासह दिव्यांग महिला उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.