05371
कुरुंदवाड आगाराच्या ताफ्यात
पाच नव्या लालपरी दाखल
कुरुंदवाड ता. २४ ः कुरुंदवाड एसटी.आगाराच्या ताफ्यात आज आणखी पाच नव्या लालपरी दाखल झाल्या. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते नृसिंहवाडी बसस्थानक आवारात या नव्या एसटी बसेसचे पूजन झाले. काही दिवसांपूर्वी दहा नव्या बसेस कुरुंदवाड आगाराला उपलब्ध झाल्या होत्या. त्यात आणखी पाच बसेसची भर पडल्याने कुरुंदवाड आगाराची वाहतूक आणखी गतिमान होणार आहे.
आमदार यड्रावकर म्हणाले, ‘‘ मी कुरुंदवाड आगाराला १० नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. आता आणखी पाच बसेसची भर पडली असून तालुक्यातील कानाकोपऱ्यात सेवा देण्यासाठी कार्यरत राहतील. नव्या बसेस ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रवास सुलभ,वेळेवर व आरामदायक ठरणार आहे.’ यावेळी विभाग नियंत्रक शिवराज जाधव, अनिल मादनाईक, प्रकाश पाटील (टाकवडेकर), शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, संजय नांदणे, प्रा. चंद्रकांत मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, रणजीत पाटील, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, भाजपा नेते मुकुंद गावडे उपस्थित होते. आमदार.डॉ. पाटील-यड्रावकर म्हणाले, ‘‘जयसिंगपूर बसस्थानकातील फलाट व आवाराचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून नृसिंहवाडी येथील बस स्थानकाचे काँक्रिटीकरणही पूर्णत्वास आले आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील बस स्थानके अधिक सुसज्ज, आधुनिक व सौंदर्यपूर्ण होत आहेत.’ यावेळी दादेपाशा पटेल, अक्षय आलासे, अभिजीत जगदाळे, दीपक गायकवाड, धनाजी जगदाळे, विद्याधर कुलकर्णी, संभाजी भोसले, फजल पटेल, औरवाडचे सरपंच शफी पटेल, सोमेश गवळी, विकास कदम उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.