कुरुंदवाडमध्ये ३४५ रेशनधारकांना नोटिसा
उच्च उत्पन्न गटातील लाभार्थी; धान्य बंद होण्याची शक्यता
कुरुंदवाड, ता. १० ःप्राधान्यक्रम योजनेअंतर्गत स्वस्त धान्याचा लाभ घेत असलेल्या शहरातील ३४५ हून अधिक लाभार्थ्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या कुटुंबातील सदस्य उच्च उत्पन्न गटातील आहेत. ते आयकर भरत असल्याचे आढळल्याने ही कारवाई केली आहे. त्यामुळे या सध्या मिळणारे रेशनवरील धान्य बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रधान्यक्रम तसेच उच्च उत्पन्न गटातील कुटुंबातील सदस्यांना सदस्य संख्यानिहाय शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत धान्य म्हणून गहू व तांदूळ वाटप करण्यात येते. तथापि अधिक उत्पन्न असणारे, आयकर भरणारे शिवाय नोकरदार किंवा सधन असणारेही या यादीत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्या होत्या. शासनाने मिशन सुधार मोहीम सुरू केली असून, त्याअंतर्गत आयकर भरणारे, उच्च उत्पन्न गटाची पडताळणी सुरू केली. शासनाने निश्चित केलेल्या निकषांबाहेरील कुटुंबांची तपासणी केली आहे. त्यातून अपात्र लाभार्थी शोधले आहेत. त्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करून त्या दृष्टीने नोटिसा लागू केल्या आहेत.
नोटीस मिळालेल्यांनी कुटुंबातील उच्च उत्पन्न असलेल्या सदस्याचे नाव रेशन कार्डमधून कमी करणे, परगावी राहत असल्याचे दाखवून नाव स्थलांतरित करणे किंवा स्वतंत्र रेशन कार्ड मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे; मात्र मिशन सुधार मोहिमेत संपूर्ण कुटुंबाची आर्थिक पडताळणी, आयकर विभागाशी समन्वय व विविध शासकीय नोंदींची तपासणी केली जात आहे. त्यामुळे हे पर्याय उपयोगी पडणार नसल्याचे एजंट व सेवा केंद्रचालकाकडून बोलले जात आहे. यामुळे लाभार्थ्यांच्यात चिंता वाढली आहे.
--
कोट
रेशनवरील मोफत धान्य योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना होणे गरजेचे आहे. काही लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे, तर काही लोक यादीत अपात्र आहेत, मात्र यादीत नाव असल्यामुळे लाभ घेत आहेत. पात्र अन्नधान्याचा लाभ पोहोचविण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करणे आवश्यक ठरले आहे. उच्च उत्पन्न गटातील, आयकर भरणाऱ्या, तसेच धान्याची गरज नसलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने लाभाचा त्याग करावा.
- वैशाली माळी, नायब तहसीलदार.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.