कोल्हापूर

शिवकालीन शस्त्र संवर्धन, चंद्रकांत मांडरे संग्रहालयाच्या निविदांना मंजुरी

CD

लक्ष्मी विलास पॅलेसमधील
शिवकालीन शस्त्र संवर्धनास निधी
चंद्रकांत मांडरे कलासंग्रहासाठीही वाढीव सव्वा कोटी
सकाळ वृत्तसेवा
कसबा बावडा, ता. ३ : कलेचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. सांस्कृतिक वारशाची जपणूक व्हावी आणि कलेच्या वैभवात भर पडावी म्हणून राज्यशासनाने दोन महत्त्‍वाचे निर्णय घेतले आहेत. लक्ष्मी विलास पॅलेसमधील शिवकालीन शस्रांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ४८ लाख रुपयांच्‍या निविदेला मान्यता दिली आहे. तसेच चंद्रकांत मांडरे कलासंग्रहासाठी सव्वा कोटी रुपयांच्या अधिक खर्चाच्या निविदेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यसरकारने ३५० व्‍या राज्याभिषेक सोहळ्यांतर्गत १३ राज्यसंग्रहालयांतील शिवकालीन शस्त्रांचे जतन व संवर्धन करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस म्हणजे राजर्षी शाहू जन्मस्थळाचा समावेश होता. त्यामुळे या संग्रहालयातील १३१ शिवकालीन शस्त्रांचे संवर्धन व जतन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ४३ लाख रुपयांच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे.
चित्रकार चंद्रकांत मांडरे यांच्या संग्रहालय नूतनीकरणासाठी पूर्वी तीन कोटी ५५ लाख रुपयांची निविदा सादर केली होती. दरम्यान, यानंतरच्या काळातील वस्तू व सेवा कर यातील वाढ लक्षात घेऊन राज्य शासनाने चार कोटी ७१ लाख इतक्या रकमेच्या सुधारित प्रशासकीय निविदेस मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काळात कोल्हापूरच्या कला आणि सांस्कृतिक संग्रहात भर पडणार आहे.
-------------
कोट
शिवशास्‍त्रशौर्य या प्रदर्शनासाठी निवडलेल्या शस्त्रांना गंज लागू नये म्हणून त्यांचे रासायनिक संवर्धन होणार आहे. तलवारी, धोप, भाले, कट्यारी, दानपट्टा, बुर्ज अशा शस्त्रांचा यामध्ये समावेश असणार आहे. गिरीश जाधव यांच्या संग्रहातील ही शस्त्रे असणार आहेत. येत्या चार ते पाच महिन्यांत हे काम पूर्ण होईल.
- उदय सुर्वे, सहायक अभिरक्षक, वस्तुसंग्रहालय कोल्हापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT