कोल्हापूर

स्मशानभूमीवरील पत्रे वाऱ्याने उखडले

CD

00962, 00963

कसबा बावडा स्मशानभूमीवर
नवे पत्रे बसविण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
कसबा बावडा, ता. २१ : येथे सोमवारी (ता. २०) सायंकाळी झालेला वळवाचा पाऊस आणि वाऱ्यामुळे वैकुंठधाम स्मशानभूमीवरील पत्र उखडले. पत्रे उखडल्याने पाऊस आला की, स्मशानभूमीत पाणी गळते. परिणामी अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण येऊ शकतात. त्यामुळे तत्काळ नवे पत्रे बसविण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुन्हा वादळ- वाऱ्याचा पाऊस झाला तर उखडलेले पत्रे उडून जाण्याची शक्यता आहे.
काल सायंकाळी झालेला वळवाचा पाऊस आणि वाऱ्यामुळे स्मशानभूमीत ही परिस्थिती निर्माण झाली. आज महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली. येत्या काही दिवसांत पत्र्याचे काम होईल, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. बावड्यातील वैकुंठधामचे काम २०१८ मध्ये झाले असून याला सात वर्षे पूर्ण झाली. येथील पत्र्यांची झीज झाली असून ते बदलण्याची गरज आहेच स्मशानभूमीच्या उजव्या बाजूचे पत्रे आणि पन्हाळी खराब झाली आहे. सध्या स्मशानभूमीत चौदा बेड आहेत. अनेकवेळा एकापेक्षा जास्त मृतदेह असले तर इतर बेड वापरावे लागतात. मात्र बऱ्याच ठिकाणी पाणी गळते. त्यामुळे हे काम पावसाळ्याआधी होणे आवश्यक आहे. हे काम केले तर दोन-तीन दिवसांत होऊ शकते. मात्र महापालिकेने लक्ष घालून गांभिर्याने काम करणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. हे काम लवकर झाले नाही तर भर पावसात महापालिका कर्मचाऱ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

चौकट
स्मशानभूमीच्या बाजूला कोरोना काळात बांधलेले शेड आहे. हे शेड कालच्या वाऱ्यामुळे एकाच बाजूस वाकले आहे. येथे शेणी ठेवल्या असून पावसामुळे त्या भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेडची दुरुस्ती करणेही आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Wardha News: बदलीसाठी २० हजारांची मागणी; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT