कोल्हापूर

आज बावडा फुटबॉल लीगचा अंतिम सामना रंगणार

CD

00994
बावडा फुटबॉल लीग विजेता ठरणार आज
संभाजी, नीलेश, सौरभ, वावरे वॉरियर्स संघ उपांत्य फेरीत
सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा, ता. १ : सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बावडा फुटबॉल प्रीमिअर लीगच्या उपांत्य फेरीत संभाजी जाधव, नीलेश वॉरियर्स, कै. सौरभ लांडगे, वावरे वॉरियर्स हे चार संघ दाखल झाले. आज दिवसभरात बावड्यातील फुटबॉलप्रेमींना सामन्यांचा थरार अनुभवता आला.
सकाळच्या सत्रात पहिला सामना नीलेश वॉरियर्स विरुद्ध श्रीअंश स्पोर्टस् यांच्यात रंगला. यामध्ये नीलेश वॉरियर्सकडून पहिल्या गोलची नोंद झाली. उर्वरित पूर्ण सामन्यांमध्ये श्रीअंश स्पोर्टसला गोलची परतफेड करता आली नाही. त्यामुळे हा सामना नीलेश वॉरियर्स १-० ने जिंकला.
दुसरा सामना समर्थ व्हेजिस स्पोर्टस् विरुद्ध संभाजी जाधव स्पोर्टस् यांच्यामध्ये झाला. सामन्याच्या सुरुवातीला संभाजी जाधव स्पोर्टस् कडून एक गोलची नोंद झाली. दुसऱ्या हाफमध्ये समर्थ व्हेजीस स्पोर्टस् ने लागोपाठ तीन गोलची नोंद केली. या सामन्याची विजयी पताका समर्थ वेजिस स्पोर्ट्सने ३-१ ने फडकावली.
दुपारच्या सत्रातील पहिला सामना प्रिशा स्पोर्टस् विरुद्ध कै. सौरभ लांडगे स्पोर्टस् या संघांमध्ये रंगला. कै. सौरभ लांडगे स्पोर्टस् संघाकडून स्वयंगोल करून प्रिशा स्पोर्टस् ला एक गोलने आघाडी मिळाली. उर्वरित वेळेत दोन्ही संघांकडून जोरदार चढाया झाल्या. मिळालेल्या संधीचे सोने करत कै. सौरभ लांडगे स्पोर्टस् ने गोल करून विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात वावरे वॉरियर्स विरुद्ध हर्षद घाटगे स्पोर्टस् यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या मिनिटाला वावरे वॉरियर्स संघाच्या खेळाडूने उत्कृष्ट गोल करून वावरे वॉरियर्स संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. दरम्यान, उद्या सकाळच्या सत्रामध्ये (ता. २) दोन उपांत्य सामने होतील.. सायंकाळी ६ वाजता अंतिम सामना खेळला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT