कोल्हापूर

आत्मा अंतर्गत खरीप हंगामच्या शेतीशाळेस महिलांचा प्रतिसाद

CD

01022

आत्माअंतर्गत खरीप हंगामाच्या
शेतीशाळेस महिलांचा प्रतिसाद

कसबा बावडा, ता. ९ : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगामच्या सोयाबीन पीक व्यवस्थापन विषयावर हलसवडे येथील महिलांसाठी शेतीशाळा सुरू झाली. शेतीशाळेचे उद्घाटन ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालिका रक्षा शिंदे यांच्याहस्ते झाले. यावेळी शेतकरी महिला उपस्थित होत्या.
प्रकल्प संचालिका शिंदे यांनी महिलांना सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शन केले. शेतीशाळेचा मुख्य उद्देश आणि त्यातून आर्थिक विकास याविषयी संवाद साधला. सोयाबीन पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या व्यवस्थापनाची माहिती दिली. यावेळी एकरी एक हजार रुपये अनुदान तत्त्वावर सोयाबीन बियाण्याचे वाटप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यामध्ये सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, चिंचवाड, वळिवडे, वसगडे, उचगाव, सरनोबतवाडी, मुडशिंगी आदी गावांचा समावेश होता. बियाणे उगवण क्षमता, तपासणी व बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखविली. माती परीक्षणाबाबत प्रदीप रोकडे यांनी मार्गदर्शन केले. सुंदरम माने यांनी महिला शेतकरी गट स्थापन करण्याचे फायदे सांगितले. नवीन गटाची निर्मिती कशी करावी याची माहिती सांगितली. गटाला नवीन दिशा देऊन व्यवसाय उभा करण्याचे आवाहन केले. लग्न विभागाच्या माध्यमातून महिलांना कुक्कुटपालन व पीएमएफएमइ योजनेअंतर्गत व्यवसाय निर्मितीबाबतचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन निखिल कुलकर्णी, राहुल पाटील, बसवराज बिराजदार, अरुण भिंगारदिवे, बंडा कुंभार, मोहिनी वाळेकर यांनी केले. कार्यक्रमास सोनम कांबळे, सीमा कांबळे, संगीता कांबळे, मंगल कांबळे आदी महिला शेतकरी उपस्थित होत्या. गीता कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT