कोल्हापूर

ग्यानबा तुकाराम गजरात बावड्यातील दिंडीचे प्रस्थान

CD

95829

कसबा बावडाः येथून श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज मंडप येथून दिंडीला प्रारंभ झाला.
...
ग्यानबा तुकाराम गजरात बावड्यातील दिंडीचे प्रस्थान
सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा, ता. ९ ः येथील वारकरी परंपरा असलेली श्री. तुकाराम महाराज मंडप आणि श्री. ज्ञानेश्वर महाराज मंडप येथील दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. हरिनामाच्या गजरात विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारकरी संप्रदायाने प्रस्थान केले. यावर्षी दिंडीमध्ये महिलांसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शांतादेवी डी. पाटील, पुजा ॠतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते दिंडीतील मूर्तीचे पूजन झाले.

दिंडीदरम्यान, ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात वारकरी तल्लीन झाले. त्यामुळे परिसर ज्ञानेश्वर माउलीमय झाला. श्री. ज्ञानेश्वर महाराज मंडप व श्री. तुकाराम महाराज मंडप येथून दिंडीला सुरुवात झाली. यंदा दिंडीसाठी अडीचशे वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले. दहाव्या दिवशी म्हणजेच १५ जुलै रोजी ही दिंडी पंढरपूर येथील भक्तनिवासात पोहोचणार आहे. यावर्षी प्रामुख्याने दिंडीमध्ये युवकवर्गाचा सहभाग अधिक दिसला. तसेच वारकऱ्यांमध्ये साठ टक्के महिलांचा समावेश आहे, अशी माहिती मंडपचे अध्यक्ष तानाजी चव्हाण यांनी दिली. तारदाळ, मिरज, शिरढोण, केरेवाडी, पाचेगाव, सांगोला असा दिंडीचा मार्ग असणार आहे.
कसबा बावडा वारकरी संप्रदायाकडून दिंडीचे आयोजन केले जाते. यावेळी बाबूराव बेडेकर, अशोक नाटेकर, बाजीराव कारंडे, सर्जेराव मालेकर, श्रीहरी पाटील, राजू पाटील यांच्यासह श्रीराम सोसायटी चेअरमन उमाजी उलपे व दत्ता मासाळ, विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ, वारकरी उपस्थित होते.
...

वारकऱ्यांना अल्पोपाहार वाटप

विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ यांच्या वारकरी दिंडीचे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने स्वागत करून अल्पोपाहार वाटप करण्यात आले. यावेळी सुनील जाधव, कृष्णा लोंढे, रोहन उलपे, सचिन पाटील, आदर्श जाधव, सूरज सुतार, रोहन बागडी, प्रज्वल चव्हाण, भोला सुतार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

SCROLL FOR NEXT