कोल्हापूर

कसबा तारळे येथील प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी २३ कोटी ३८ लाख रुपये मंजूर : आमदार आबिटकरांच्या प्रयत्नांना मोठे यश

CD

२३ कोटींचा निधी मंजूर
कसबा तारळे उपजिल्हा रुग्णालय इमारत; आबिटकरांच्या पाठपुराव्याला यश
कसबा तारळे, ता. ५ : येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीला गतवर्षी मंजुरी दिल्यानंतर प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी शासनाने २३ कोटी ३८ लाख रुपयांच्या रकमेस मंजुरी दिली. परिणामी इमारत बांधकाम निविदा व अन्य प्रक्रियेला नक्की गती येईल, हे स्पष्ट झाले. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांनी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजुरीसाठी राज्य शासनाची मान्यता घेण्यापासून ते निधी मंजुरीपर्यंतच्या प्रक्रियेला गती देणे व अंतिमतः मान्यता मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले.
राधानगरी व गगनबावडा या दोन दुर्गम तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची हेळसांड थांबावी व कोल्हापुरात उपचार घेण्यासाठीचा ५० ते ७५ किलोमीटरचा प्रवास कमी करण्याबरोबरच आर्थिक भुर्दंडही टाळता यावा यासाठी येथील युवकांनी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी लावून धरली होती. याचे महत्त्व आमदार आबिटकर यांनी जाणून तत्कालीन आरोग्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या. पुढे खुद्द एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच राज्य शासनाने या मागणीला मंजुरी दिली. शासनाने प्रस्तावित २७ कोटी ७९ लाखांपैकी २३ कोटी ३८ लाखांच्या निधीला सोमवारी (ता. ५) मंजुरी दिली असून त्यासाठीचे आदेश सहाय्यक सचिव अशोक अत्राम यांनी संबंधित विभागांना दिले.
..............
कोट
आधी कसबा तारळे उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी व आता इमारतीच्या बांधकामासाठीही आमदार प्रकाश आबिटकर यांनी खूप मोठे प्रयत्न केल्याने लवकरच उपजिल्हा रुग्णालय आकाराला येईल. ग्रामपंचायती व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे.
- श्रीधर भोपळे-चव्हाण, प्रमुख संघटक, युवा विकास आघाडी

कोट
येथील उपजिल्हा रुग्णालय हे दोन तालुक्यातील रुग्णांच्या उपचारासाठी वरदान ठरणार असून ते या परिसराच्या विकासासाठी खूप मोठे माध्यम ठरेल." - सौ. विमल रवींद्र पाटील, सरपंच,कसबा तारळे
..............
''सकाळ''चा पाठपुरावा
येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीचा ''सकाळ''ने सातत्याने पाठपुरावा केला होता. या परिसरात वैद्यकीय उपचारांसाठीची होणारी अडचण ''सकाळ''ने अग्रक्रमाने मांडली होती. युवा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याचा आज आवर्जून उल्लेख केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT