कोल्हापूर

गुडाळ येथे शनिवारी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती प्रशिक्षण ; पालकमंत्री आबिटकरांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार

CD

गुडाळमध्ये आज
नैसर्गिक शेती प्रशिक्षण

कसबा तारळे, ता. २३ : ‘गुडाळ (ता. राधानगरी) येथे शनिवारी (ता.२४) शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि स्थानिक संयोजक संग्राम पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सहा वाजता डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती योजनेंतर्गत हे प्रशिक्षण होणार असून, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींसह उच्चस्तरीय व प्रमुख शासकीय अधिकारी यांना निमंत्रित केले आहे. यावेळी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ शांतिकुमार पाटील व प्रा. ऋतुराज चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने होणार असून, कृषी विभागाशी संबंधित विभागीय, उपविभागीय व जिल्हास्तरीय अधिकारी तसेच राज्यस्तरीय आत्मा समिती सदस्य अशोकराव फराकटे, दीपक शेट्टी, तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख संयोजक असलेल्या जिल्ह्याच्या आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, तालुका सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे व स्थानिक शेतकरी कंपनीचे संस्थापक संग्राम पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब चालकांनो लक्ष द्या! ओला-उबर चालवायची असेल तर आधी ५ दिवसांचे प्रशिक्षण अनिवार्य; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

IND vs ZIM: "जे प्रॅक्टिसमध्ये करतो, तेच मॅचमध्येही..." वैभव सूर्यवंशी 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकल्यावर काय म्हणाला?

Police Station Fire : भायखळा पोलिस ठाण्यात अचानक आग; ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग

10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT