कोल्हापूर

जिल्हा लोककलाकार मानधन कमिटी स्थापन करा ! अन्यथा तीव्र आंदोलन - विलास पाटील.

CD

वृद्ध लोककलाकार मानधन समिती
स्थापनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कसबा वाळवे, ता. २२ : सोलापूर, सांगलीसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या मानधन कमिट्या स्थापन होऊन त्यांचे मानधन सुरु झाले आहे. मात्र, चार वर्षांपासून जिल्ह्यात वृद्ध लोककलाकार मानधन समिती स्थापन झालेली नाही. याबाबत जिल्हा लोककलाकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनाचा आशय असा, ‘वयोवृद्ध कलाकाराला वर्षाकाठी २४ हजार ७०० रु. मानधन मिळते. असे हजारो कलाकार मानधनाविना उपेक्षित आहेत. जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि पालकमंत्र्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळेच जिल्हा लोककलाकार मानधन समिती स्थापन झाली नाही. चार वर्षांपासून ज्यांनी मानधनासाठी अर्ज केले आहेत त्यांना मानधन कमिटीच अस्तित्वात नसल्यामुळे मानधन मिळू शकले नाही. यामुळे हजारो वयोवृद्ध कलाकार मानधनाविना खितपत पडले असून त्यांच्यावर वृद्धपणी उपासमारीची वेळ आली आहे.
लोककलाकार मानधन कमिटी स्थापन करुन न्याय द्यावा. अन्यथा वृद्ध कलाकार तीव्र आंदोलन करतील.’ जिल्हा लोककलाकार संघाचे अध्यक्ष विलास पाटील, सचिव रामभाऊ चौगलेंसह वृद्ध कलाकारांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यांना निवेदन दिले. २०१९ पासून जिल्हा लोककलाकार संघाने संबंधित विभागांना पत्रे पाठवून व प्रत्यक्ष भेटून विनंती करुनही कमिटी अस्तित्वात नाही. इतर जिल्ह्यांच्या कमिट्या जाहीर झाल्या असताना कोल्हापूर जिल्ह्यावरच अन्याय का, असा संतप्त सवाल अध्यक्ष विलास पाटील यांनी निवेदनात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT