कोल्हापूर

कलाकारांच्या मागण्यासाठी लोककलाकार जिल्हा संघटनेचे निवेदन

CD

01197
वृद्ध लोककलाकार मानधन
कमिटी स्थापनेसाठी निवेदन
कसबा वाळवे, ता. ५ ः महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत वृद्ध लोककलाकार मानधन कमिटी स्थापन झाली असली तर राजर्षी शाहूंचा कोल्हापूर जिल्हा मात्र त्यापासून वंचित आहे. त्यामुळे अनेक वृध्द कलाकारांची मानधनाअभावी उपासमार होते आहे. लवकरात लवकर ही कमिटी स्थापन करुन वृद्ध कलाकारांचे मानधन त्वरीत चालू करावे या मागणी साठी कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील लोककलाकारांच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यासाठी मागणीचे निवेदन राज्य सांस्कृतिक धोरण लोककला उपसमितीचे सदस्य जगन्नाथ हीलिम, दौलतराव कांबळे आणि प्रा. पट्टेबहादूर यांच्याकडे सुपूर्द केले. निवेदनाद्वारे, लोककलाकारांचे आर्थिक महामंडळ असावे, वृद्ध मानधन मंजुरी कोटा १०० वरुन ५०० करावा, उत्पन्नाची अट ४८ हजारवरुन एक लाख करावी, कलावंत मानधन मंजूर करताना चाचणी घेऊन मानधन मंजूर करावे, पूर्वीप्रमाणे कलामहोत्सव सुरू करावेत, शाळा कॉलेजमध्ये संगीत शिक्षक भरावेत आदींसह इतर मागण्या केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष विलासराव पाटील यांच्यासमवेत शामराव खडके, अनिल मोरे, मंगला गुरव, तमाशा कलावंत शंकर ढवळे, समाधान कांबळे, रामभाऊ चौगले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT